Homeताज्या बातम्यासंपादकीय

न्यू वर्ल्ड ऑर्डर म्हणजे काय ? 

न्यू वर्ल्ड ऑर्डर ही संकल्पना स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाला किल्ल्यावर झालेल्या भाषणातून देशवासियांना समजली.

इराणीं’चे अज्ञान की असंवेदनशीलता ? 
ओबीसींना न्याय नाकारणारे आरक्षण मागताहेत ! 
महाराष्ट्र ते अमेरिका : राज, अर्थ आणि सत्ताकारण!

न्यू वर्ल्ड ऑर्डर ही संकल्पना स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाला किल्ल्यावर झालेल्या भाषणातून देशवासियांना समजली. गेल्या काही वर्षांपासून जगभरात न्यू वर्ल्ड ऑर्डर च्या संकल्पनेवर  विचारवंतांकडून सातत्याने टिका होत आली आहे. वर्षभरापूर्वी कोरोनापासून आपण मुक्त झालो असलो तरी त्याच्या धोक्यापासून बाहेर आलेलो नाही. कोरोना हा व्हायरस जगभरात मृत्यूचे थैमान घालत असताना जगात या संकल्पनेवर चर्चा सुरू झाली आहे. यानुसार जगाची एक पुनर्रचना केली जाणार असल्याचे संकेत विचारवंत अधूनमधून देत असतात. दुसऱ्या महायुध्दापूर्वी जग वेगवेगळ्या सरंजामी शासन व्यवस्थेने वाटचाल करीत होते; तर युरोपीय देश उत्क्रांत लोकशाहीकडे वाटचाल करीत होते.‌ या दोन्ही व्यवस्थातील संघर्ष दुसऱ्या महायुद्धाने संपुष्टात आला असला, तरी यानंतर जगाने शीतयुद्धाच्या माध्यमातून वाटचाल सुरू केली होती; हे शितयुद्ध भांडवलशाही आणि समाजवादी अर्थव्यवस्था या दोन अर्थव्यवस्थांमधील हा संघर्ष होता.  या संघर्षात जगाची वाटणी दोन विभागांमध्ये झाली होती. यातील निम्मे जग हे भांडवलशाही कडे आकृष्ट झाले होते, तर निम्मे हे साम्यवादी अर्थव्यवस्थेकडे झुकले होते. अशातच जो एक गट उरला होता, त्याचे नेतृत्व मिश्र अर्थव्यवस्थेच्या अनुषंगाने, ‘ तिसरा गट ‘ म्हणून भारताने पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वात केलं होतं.

हा वास्तव इतिहास पाहिल्यानंतर आपल्याला स्पष्टपणे म्हणता येईल की, दुसऱ्या महायुद्धानंतर उभी राहिलेली ही व्यवस्था जगभरात ऐशी नंतरच्या काळामध्ये कोसळायला सुरुवात झाली. कारण, अमेरिकेने भांडवली आक्रमण अधिक आक्रमकपणे आणलं होतं. भारताने याचा स्वीकार १९९१ मध्ये केला आणि त्याची परिणीती आज भारतातील मिश्र अर्थव्यवस्था संपुष्टात येऊन भारत केवळ भांडवली अर्थव्यवस्थेच्या अनुषंगाने वाटचाल करणारा देश उरला आहे.  हीच न्यू वर्ड ऑर्डर आहे का? या न्यू वर्ड ऑर्डर मध्ये मानवी श्रम हे कुचकामी होणार आहे! तंत्रज्ञान हे अत्युच्च पातळीवर पोहोचणार आहे.  तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जी लोकसंख्या बेरोजगार होणार आहे, बेकामी होणार आहे, त्या लोकसंख्येचं करायचं काय? हा प्रश्न न्यू वर्ड ऑर्डरने जगासमोर आणला आहे. त्यातूनच  जगातल्या विचारवंतांनी आरोप केला होता की न्यू वर्ल्ड ऑर्डर  च्या थिम नुसार कोरोनाचा व्हायरस आला होता का? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला होता. त्यामुळे आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी जाहीरपणे ही संकल्पना आपल्या भाषणातून बोलून दाखवली आहे; त्यामुळे या संकल्पनेचा पंतप्रधानांनी देशासमोर अर्थ स्पष्ट करावा! कारण, न्यू वर्ड ऑर्डर ही संकल्पना एकूणच जगाच्या पातळीवर ज्या पद्धतीने वाटचाल करते आहे, ते पाहता, हे शब्द नेमका काय आशय व्यक्त करतात, याची देशवासियांना उत्सुकता आहे .  ज्या पद्धतीने जगात  या विषयावर बोललं जात आहे, ते पाहता, जग या न्यू वर्ड ऑर्डरने भयभीत झाला आहे. त्यामुळे एका मागोमाग अनेक साथीच्या आजारांची लाट येणार आहे का, याचाही संशय जगातल्या नागरिकांच्या, जगातल्या लोकांच्या मनामध्ये उभा राहिलेला आहे. अशा काळात ही संकल्पना राज्य व्यवस्थेच्या एखाद्या प्रमुखांनी बोलून दाखवणं ही खरोखर एक चिंताजनक बाब आहे. त्यांच्या या संकल्पनेचा अर्थ नेमका काय आहे याचे स्पष्टीकरण निश्चितपणे लोकांसमोर यायला हवं.

COMMENTS