Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

ममता बॅनर्जींचा भवानीपुरमधून उमेदवारी अर्ज दाखल; भाजपचेे सुवेंदू अधिकारी यांच्याविरुद्ध थेट सामना

नवी दिल्ली : पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी भवानीपूर विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या मतदारसं

‘मी राजीनामा देणार नाही, आम्ही हरलोच नाही!’; बंगालमध्ये पराभवानंतरही ममता दीदींचा पवित्रा
मतदानाची वाढती टक्केवारी कोणाला तारणार?
बंगालमध्ये विजयाचा जल्लोष ठरतोय रक्तरंजित राजकीय संघर्षात 3 कार्यकर्त्यांचा बळी गेल्याने तणाव वाढला

नवी दिल्ली : पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी भवानीपूर विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या मतदारसंघात त्यांच्यासमोर भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांचे आव्हान उभे आहे. अधिकारी हे सध्या विरोधी पक्षनेते असून त्यांनी यापूर्वीच आपला अर्ज दाखल केला आहे.
भवानीपूरसह नंदिग्राम या मतदारसंघातही बॅनर्जी आणि अधिकारी यांच्यातील राजकीय संघर्ष लक्षवेधी ठरत आहे. दोन हजार एकवीसच्या निवडणुकीत नंदिग्राममध्ये अधिकारी यांनी बॅनर्जी यांचा पराभव केला होता. त्यामुळे या वेळी दोन्ही नेत्यांतील सामना अधिकच चुरशीचा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गोव्यातील पोंडा पोटनिवडणूक स्थगित
गोव्यातील पोंडा विधानसभा पोटनिवडणूक सध्या स्थगित करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर नऊ एप्रिल रोजी होणारे मतदान पुढे ढकलण्यात आले असून निवडणूक प्रक्रियेसाठी नव्याने अधिसूचना जाहीर करावी लागणार आहे.

COMMENTS