Homeताज्या बातम्या

अशोकरावांविरुद्ध सर्वपक्षीय मोर्चेबांधणी? नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपला रोखण्यासाठी पडद्यामागे जोरदार हालचाली

नांदेड : नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत यंदा थेट भाजप विरुद्ध सर्व पक्ष असा सामना रंगण्याची चिन्हे दिसू लागली

अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत फेरोज खान यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
महायुतीचा धर्म सर्वोच्च; नांदेडमध्ये एकसंघतेचा संदेशसंवादातूनच राजकीय प्रश्नांचे निराकरण शक्य; महायुती अधिक बळकट करण्याचा निर्धारराज्यातील जागावाटपाचा निर्णय सर्वांनी स्वीकारावा; नांदेडमध्ये अमरनाथ राजूरकर यांच्याभोवती महायुती एकवटली – खासदार अशोकराव चव्हाणप्रवीण चिखलीकरांचा अर्ज मागे; अमरनाथ राजूरकरांच्या विजयासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीर पाठिंबा – आमदार  चिखलीकर
नांदेड विधान परिषद : नोटांच्या राजकारणाने निष्ठा गिळंकृत; राजूरकरांच्या विजयाने महाविकास आघाडीचा बुरखा फाटला!सत्तेच्या सौद्यात पक्षनिष्ठांचा बाजार; पडद्यामागील गुप्त हातमिळवणीने जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले

नांदेड : नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत यंदा थेट भाजप विरुद्ध सर्व पक्ष असा सामना रंगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या वाढत्या प्रभावाला लगाम घालण्यासाठी महायुतीतील काही मित्रपक्षांसह विरोधी पक्षातील नेते एकाच व्यासपीठावर येण्याच्या हालचाली सुरू झाल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

भाजपकडून पुन्हा एकदा माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांचे नाव आघाडीवर असल्याचे मानले जात आहे. खासदार अशोकराव चव्हाण यांचे पाठबळ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील भाजपची मजबूत पकड लक्षात घेता अमरनाथ राजूरकर यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. मात्र, याच पार्श्वभूमीवर भाजपच्या विजयाचा मार्ग रोखण्यासाठी विविध राजकीय पक्षांनी पडद्यामागे मोर्चेबांधणी सुरू केल्याचे समोर येत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा तसेच शिवसेनेतील काही प्रभावी नेत्यांनी अलीकडेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे. या चर्चेचा केंद्रबिंदू ‘नांदेडमध्ये भाजपचा विजय रोखायचा कसा?’ हाच असल्याचे बोलले जात आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील स्थानिक नेत्यांनी एकत्रित रणनीती आखण्यास सुरुवात केल्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेनेचे विधान परिषद गटनेते आमदार हेमंत पाटील यांनीही भाजपला सहज विजय मिळू न देण्याची भूमिका घेतल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. त्यामुळे महायुतीच्या घटक पक्षांमध्येच मतभेद उघडपणे समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, काँग्रेसचे खासदार प्रा. रवींद्र चव्हाण, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, माजी आमदार माधवराव जवळगावकर यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांशी संपर्क साधून भाजपविरोधी एकजूट निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतांची गणिते जुळविण्यासाठी सर्व स्तरांवर हालचाली वेगाने सुरू आहेत.

दुसरीकडे, अशोकराव चव्हाण मात्र शांतपणे संपूर्ण राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. त्यांनी अद्याप कोणतेही पत्ते उघड केले नसले, तरी जिल्ह्यातील बदलत्या समीकरणांची त्यांना पूर्ण जाणीव असल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. त्यामुळे ऐनवेळी ते कोणती खेळी करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकीकडे भाजपचे संघटनबळ आणि खासदार अशोकराव चव्हाण यांचा प्रभाव, तर दुसरीकडे त्यांच्याविरोधात आकार घेत असलेली सर्वपक्षीय आघाडी- या संघर्षामुळे नांदेडची विधान परिषद निवडणूक राज्याच्या राजकारणात विशेष चर्चेचा विषय ठरणार हे मात्र निश्चित दिसत आहे.

COMMENTS