कोपरगाव : पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम देशातील इंधन वितरण व्यवस्थेवर होत असून कोपरगाव तालुक्यातही घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरचा काही प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. यामुळे नागरिक व छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याने प्रशासन व गॅस एजन्सींनी समन्वय ठेवून वितरणाचे योग्य नियोजन करावे, अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी दिल्या. गॅस टंचाई तसेच तालुक्यातील अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे पिकांचे झालेले नुकसान या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी तहसीलदार महेश सावंत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. आ. काळे म्हणाले, की पश्चिम आशियातील युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची झळ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचली आहे. गॅस उपलब्धतेबाबत भीती निर्माण झाल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात बुकिंगसाठी संपर्क करत आहेत. अशा वेळी गॅस एजन्सींनी संयम राखून पारदर्शकपणे काम करावे. ग्राहकांशी सौजन्याने संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात. प्रत्येक एजन्सीने कार्यालयात जबाबदार व्यक्तीची नियुक्ती करून नागरिकांच्या प्रश्नांना योग्य प्रतिसाद द्यावा. तसेच वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मोबाईल सुरू ठेवून ग्राहकांशी संपर्कात राहावे. गॅस वितरणात काळाबाजार, वशिलेबाजी किंवा गोंधळ सहन केला जाणार नाही. नागरिकांना वेळेत गॅस पुरवठा व्हावा, यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना कराव्यात, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. बैठकीस तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, पुरवठा अधिकारी देविदास फोपसे, आदिती भालेराव, नितीन चौधरी, दिपक गरुड यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, गॅस एजन्सीचे संचालक व नागरिक उपस्थित होते. अवकाळीच्या नुकसानीचा अचूक अहवाल सादर करा कोपरगाव तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे उभ्या पिकांसह फळबागा व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात झाले आहे. महसूल व कृषी विभागाने तात्काळ पंचनामे पूर्ण करून शासनाकडे अचूक अहवाल सादर करावा. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी प्रशासनाने तत्परतेने काम करावे, असे निर्देश आ. काळे यांनी दिले.

कोपरगाव : पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम देशातील इंधन वितरण व्यवस्थेवर होत असून कोपरगाव तालुक्यातही घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरचा काही प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. यामुळे नागरिक व छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याने प्रशासन व गॅस एजन्सींनी समन्वय ठेवून वितरणाचे योग्य नियोजन करावे, अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी दिल्या.
गॅस टंचाई तसेच तालुक्यातील अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे पिकांचे झालेले नुकसान या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी तहसीलदार महेश सावंत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
आ. काळे म्हणाले, की पश्चिम आशियातील युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची झळ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचली आहे. गॅस उपलब्धतेबाबत भीती निर्माण झाल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात बुकिंगसाठी संपर्क करत आहेत. अशा वेळी गॅस एजन्सींनी संयम राखून पारदर्शकपणे काम करावे. ग्राहकांशी सौजन्याने संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात.
प्रत्येक एजन्सीने कार्यालयात जबाबदार व्यक्तीची नियुक्ती करून नागरिकांच्या प्रश्नांना योग्य प्रतिसाद द्यावा. तसेच वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मोबाईल सुरू ठेवून ग्राहकांशी संपर्कात राहावे. गॅस वितरणात काळाबाजार, वशिलेबाजी किंवा गोंधळ सहन केला जाणार नाही. नागरिकांना वेळेत गॅस पुरवठा व्हावा, यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना कराव्यात, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.
बैठकीस तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, पुरवठा अधिकारी देविदास फोपसे, आदिती भालेराव, नितीन चौधरी, दिपक गरुड यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, गॅस एजन्सीचे संचालक व नागरिक उपस्थित होते.
अवकाळीच्या नुकसानीचा अचूक अहवाल सादर करा
कोपरगाव तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे उभ्या पिकांसह फळबागा व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात
झाले आहे. महसूल व कृषी विभागाने तात्काळ पंचनामे पूर्ण करून शासनाकडे अचूक अहवाल सादर करावा. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी प्रशासनाने तत्परतेने काम करावे, असे निर्देश आ. काळे यांनी दिले.

COMMENTS