HomeUncategorized

कराड शहरात काही तासात 4 टन कचरा गोळा

कराड / प्रतिनिधी : कराड शहरात दिवाळी व लक्ष्मीपूजनानिमित्त झालेला फटाक्यांचा कचर्‍याची स्वच्छता करून संपूर्ण कराड शहर पालिकेच्या कर्मचार्‍यांनी क

जीप पलटी झाल्याने जेजुरीहून धुळदेवकडे निघालेल्या नवरदेवाचा अपघाती मृत्यू
उसाचा ट्रॅक्टर गोपूजच्या पुलावरून कोसळला
विद्रोही साहित्य संमेलन संयोजन समितीच्या अध्यक्षपदी हभप डॉ. सुहास फडतरे महाराज यांची निवड

कराड / प्रतिनिधी : कराड शहरात दिवाळी व लक्ष्मीपूजनानिमित्त झालेला फटाक्यांचा कचर्‍याची स्वच्छता करून संपूर्ण कराड शहर पालिकेच्या कर्मचार्‍यांनी काही तासात स्वच्छ केले. या काळात शहरातून एकूण 4 टन कचरा काढण्यात आला. हा कचरा घनकचरा व्यवस्थापन केंद्रावर देऊन त्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात आली.
कराड शहर स्वच्छतेबाबत नेहमीच जागरूक असते. देशातील टॉप थ्रीमध्ये असलेल्या या शहरातील पालिका अधिकारी व कर्मचारी नेहमीच सतर्क असल्याचे पहायला मिळातात. गणपती, नवरात्र असो कि दिवाळी या दरम्यान पालिका स्वच्छतेसाठी विशेष मोहिम राबविते. या मोहिमेत प्रामुख्याने स्वच्छता कर्मचारी आपली जबाबदारी बिनचोखपणे पार पाडतात. या गोष्टीचा प्रत्यय कराडकरांना नेहमीच पहायला मिळत आला आहे. गणपती उत्सवात विसर्जन मिरवणूकानंतर अगदी रात्रीच्या वेळी पालिकेच्या कर्मचार्‍यांनी नदीकाठ व शहर स्वच्छ केले होते. तेव्हाही टनामध्ये कचरा गोळा केला होता.
आताही सोमवारी दिवाळीच्या पहिल्या दिवशी लक्ष्मी पूजनाला शहरात फटाक्यांची अतिषबाजी केल्याचे पहायला मिळाले. परंतू या नंतर पालिकेच्या स्वच्छता कर्मचार्‍यांनी अगदी काही तासात कराड शहर स्वच्छ केले. यावेळी 4 टन कचरा शहरात गोळा केला. त्यामुळे स्वच्छ सुंदर कराड शहर नेहमीच पहायला मिळत आहे.

COMMENTS