Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलवरून पडून वायरमनचा मृत्यू 

देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यातील ताहाराबाद परिसरातील गडाखवाडी येथे निकृष्ट दर्जाच्या सिमेंट पोलमुळे एका खाजगी वायरमनचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे प्रशासन, कंत्राटदार आणि संबंधित यंत्रणेच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महेंद्र अर्जुन विधाटे (वय ३३, रा. म्हैसगाव) या तरुणाचा काम करत असतानाच पोल तुटून अंगावर पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना २ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास घडली.  मिळालेल्या माहितीनुसार, गडाखवाडी येथील जगताप वस्तीवर चार महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेल्या सिमेंट पोलवर नवीन विद्युत वायर ओढण्याचे काम सुरू होते. खाजगी कंत्राटदार रामभाऊ मधुकर विधाटे यांच्या मार्फत महेंद्र विधाटे व पाराजी तळपे हे वायरमन काम करत होते. वायर ओढण्यासाठी महेंद्र पोलवर चढताच अचानक संबंधित सिमेंटचा पोल जमिनीलगत तुटला आणि तो थेट शेतातील खड्ड्यात कोसळला. त्याच्यावर पोल कोसळल्याने गंभीर अंतर्गत दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.  पोल तुटल्याचा मोठा आवाज होताच ग्रामस्थ घटनास्थळी धावले. जखमी अवस्थेत महेंद्र यांना तातडीने राहुरी कारखाना परिसरातील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. बाह्य जखमा स्पष्ट दिसत नसल्या तरी अंतर्गत गंभीर दुखापती झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह राहुरी ग्रामीण रुग्णालयामार्फत लोणी येथील रुग्णालयात फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात आला. दरम्यान, या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी गंभीर आरोप करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. अवघ्या चार महिन्यांपूर्वी उभारलेला पोल इतक्या सहज कसा तुटला? संबंधित पोल वीज वितरण कंपनीचा होता की खाजगी? त्याची गुणवत्ता तपासणी कोणी केली? निकृष्ट दर्जाचा पोल बसवण्यास जबाबदार कोण? या सर्व बाबींची सखोल चौकशी करण्याची जोरदार मागणी होत आहे.  अपघातानंतर मयताच्या नातेवाईकांशी खाजगी कंत्राटदाराने अरेरावीची भाषा केल्याचा आरोपही करण्यात आला असून त्यामुळे संताप अधिकच वाढला आहे. निष्काळजीपणा, निकृष्ट साहित्याचा वापर आणि देखरेखीअभावीच एका तरुणाचा जीव गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणी राहुरी  पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला असून शवविच्छेदन अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

अंबाजोगाईत नोंदणी व मुद्रांक विभागाच्या नव्या इमारतीचे लोकार्पणआ.नमिताताई मुंदडा यांच्या हस्ते उध्दघाटन
घरकुल योजनांच्या कामात दिरंगाई सहन केली जाणार नाही : महापौर कविता मुळे
वाडी (बु.) उपजिल्हा रुग्णालयासह नांदेड उत्तरमधील सर्व विकासकामांना गती द्या;नियोजित मुदतीत कामे पूर्ण करण्याच्या आ.कल्याणकर यांच्या अधिकार्‍यांना सूचना

देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यातील ताहाराबाद परिसरातील गडाखवाडी येथे निकृष्ट दर्जाच्या सिमेंट पोलमुळे एका खाजगी वायरमनचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे प्रशासन, कंत्राटदार आणि संबंधित यंत्रणेच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महेंद्र अर्जुन विधाटे (वय ३३, रा. म्हैसगाव) या तरुणाचा काम करत असतानाच पोल तुटून अंगावर पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना २ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास घडली.

 मिळालेल्या माहितीनुसार, गडाखवाडी येथील जगताप वस्तीवर चार महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेल्या सिमेंट पोलवर नवीन विद्युत वायर ओढण्याचे काम सुरू होते. खाजगी कंत्राटदार रामभाऊ मधुकर विधाटे यांच्या मार्फत महेंद्र विधाटे व पाराजी तळपे हे वायरमन काम करत होते. वायर ओढण्यासाठी महेंद्र पोलवर चढताच अचानक संबंधित सिमेंटचा पोल जमिनीलगत तुटला आणि तो थेट शेतातील खड्ड्यात कोसळला. त्याच्यावर पोल कोसळल्याने गंभीर अंतर्गत दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.

 पोल तुटल्याचा मोठा आवाज होताच ग्रामस्थ घटनास्थळी धावले. जखमी अवस्थेत महेंद्र यांना तातडीने राहुरी कारखाना परिसरातील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. बाह्य जखमा स्पष्ट दिसत नसल्या तरी अंतर्गत गंभीर दुखापती झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह राहुरी ग्रामीण रुग्णालयामार्फत लोणी येथील रुग्णालयात फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात आला.

दरम्यान, या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी गंभीर आरोप करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. अवघ्या चार महिन्यांपूर्वी उभारलेला पोल इतक्या सहज कसा तुटला? संबंधित पोल वीज वितरण कंपनीचा होता की खाजगी? त्याची गुणवत्ता तपासणी कोणी केली? निकृष्ट दर्जाचा पोल बसवण्यास जबाबदार कोण? या सर्व बाबींची सखोल चौकशी करण्याची जोरदार मागणी होत आहे.

 अपघातानंतर मयताच्या नातेवाईकांशी खाजगी कंत्राटदाराने अरेरावीची भाषा केल्याचा आरोपही करण्यात आला असून त्यामुळे संताप अधिकच वाढला आहे. निष्काळजीपणा, निकृष्ट साहित्याचा वापर आणि देखरेखीअभावीच एका तरुणाचा जीव गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणी राहुरी  पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला असून शवविच्छेदन अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

COMMENTS