Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वालवडमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

कर्जत/प्रतिनिधी ः महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरीच्या पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालय हळगावच्या कृषि पदवीच्या चतुर्थ वर्षातील व

बेलापूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी स्वाती अमोलिक
पाच लाखासांठी महिलेचा सासरी छळ, चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
जिल्ह्यातील पाच पाणी योजनांसाठीसाडे अठरा कोटीचा निधी मंजूर

कर्जत/प्रतिनिधी ः महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरीच्या पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालय हळगावच्या कृषि पदवीच्या चतुर्थ वर्षातील विदयार्थीनींनी ग्रामीण कृषि जागरूकता व कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वालवड येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला.

त्यानिमित्ताने विदयार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून हस्ताक्षर स्पर्धा आयोजित केल्या. त्यामधील गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन गुणगौरव करण्यात आला. तृणधान्य वर्षांच्या निमित्ताने कृषिकन्यांकडून राजगीरा लाडूचे वाटप करण्यात आले. तसेच यावर्षीच्या स्वातंत्र्यदिनाची ’मेरी मिट्टी मेरा देश’ ही थीम लक्षात घेऊन जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी गावचे सरपंच, ग्रामसेविका, शिक्षकवृंद, गावकरी व विदयार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

COMMENTS