Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अपघातातील चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

जामखेड : शहरातून अकलूजकडे विद्यार्थ्यांना वाटरपारर्कला फिरायला घेऊन जात असताना झालेल्या अपघातातील जखमींपैकी ड्रायव्हरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला

दुर्गादेवी नय्यर विद्यालयात गुणगौरव सोहळा उत्साहात; मंथन व स्टुडंट टॅलेंट सर्च परीक्षेत विद्यार्थ्यांची नेत्रदीपक कामगिरी
विनयभंग करणारा आरोपी पुण्यातून जेरबंद; राहुरी पोलिसांची कारवाई; एक महिन्यानंतर जेरबंद  
ओढे-नाले साफसफाईची महापालिकेकडून निव्वळ धुळफेक

जामखेड : शहरातून अकलूजकडे विद्यार्थ्यांना वाटरपारर्कला फिरायला घेऊन जात असताना झालेल्या अपघातातील जखमींपैकी ड्रायव्हरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आशोक बाळासाहेब कोल्हे (रा. चिंचपूर, ता. आष्टी) असे मयत ड्रायव्हरचे नाव आहे.

दि ३० मार्च रोजी आशोक कोल्हे हा जामखेड शहरातील ९ वी १० वी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अकलूज येथील वॉटर पार्ककडे घेऊन जात असताना रत्नदीप मेडिकल कॉलेजजवळ वळणावर अंदाज न आल्याने ड्रायव्हरचा ताब सुटल्याने गाडी पलटी झाली होती. ज्यामध्ये ड्रायव्हरसह ८ जण जखमी झाले होते.

यातील श्रेयस प्रल्हाद राजगुरू रा. जामखेड व गाडीचा ड्रायव्हर आशोक बाळासाहेब कोल्हे हे दोघे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी अहिल्यानगरला पाठवले होते. मयत आशोक बाळु कोल्हेला छातीला मार जास्त लागल्याने प्रकृती चिंताजनक होती. अखेर अपघाताच्या दोन दिवसानंतर दि. १ एप्रिल रोजी अहिल्यानगर येथे हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान आशोक कोल्हे यांचा मृत्यू झाला. अशोक कोल्हे याच्यावर त्याच्या चिंचपूर गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या मागे पत्नी लहान एक मुलगा एक मुलगी आहे.  उर्वरित सात विद्यार्थी हे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

COMMENTS