Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

घरावर झाड कोसळून नुकसान

देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यातील जातप भागात काल सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटाने झोडपले असून येथील रहिवासी ह.भ.प.संपत महाराज जाधव या

बळीराजावर अस्मानी संकट…!
बेमोसमी अवकळा!
अचानक पावसाचा कांदा उत्पादकाला जबर फटका

देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यातील जातप भागात काल सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटाने झोडपले असून येथील रहिवासी ह.भ.प.संपत महाराज जाधव यांच्या घरावर मोठे झाड कोसळल्याने घराचे मोठे नुकसान  झाले आहे.

 याबाबत मिळालेली माहिती अशी की, गुरवारी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटने जातप भाग चांगलाच झोडपला.अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे घराशेजारील झाड उन्मळून थेट घरावर पडल्याने जाधव कुटुंबीयांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती जाधव यांनी दिली आहे. अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे परिसरातील शेतपिकांसह घरांचेही नुकसान होत असल्याने नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन महसूल विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.जाधव यांच्या घरावर झाड उन्मळून पडल्याने घराच्या नुसकानीचा पंचनामा महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी केला आहे. शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी जाधव यांनी केली आहे.

 जातप भागात गारपिटाने उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी येथिल शेतकऱ्यांनी केली आहे.

COMMENTS