मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अलीकडच्या घडामोडींमुळे अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर येत असल्याचे संकेत मिळत आहेत. पक्षाच्या राष्ट्रीय अध्य

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अलीकडच्या घडामोडींमुळे अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर येत असल्याचे संकेत मिळत आहेत. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा अजित पवार यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रावरून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि कोषाध्यक्ष शिवाजीराव गर्जे यांच्यात तीव्र वाद झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
सुनेत्रा पवार यांनी दहा मार्च रोजी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात स्वतःचा ‘अध्यक्षा’ असा उल्लेख करण्यात आला होता. तसेच शिवाजीराव गर्जे यांच्या नावासमोर ‘कोषाध्यक्ष’ अशी नोंद होती. मात्र पक्षातील ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावासमोर त्यांच्या पदांचा उल्लेख करण्यात आलेला नव्हता. याच मुद्द्यावरून नाराजी व्यक्त करत तटकरे यांनी गर्जे यांना जाब विचारल्याची चर्चा आहे. हे पत्र गर्जे यांनी तयार केल्याचे समोर आल्यानंतर या वादाला अधिकच हवा मिळाली. पक्षाच्या सहा वीस फेब्रुवारी रोजी झालेल्या कार्यकारिणी बैठकीतील कागदपत्रांमध्येही केवळ अध्यक्ष आणि कोषाध्यक्ष या पदांचाच उल्लेख करण्यात आल्याचे सांगितले जाते. यावरून तटकरे आणि गर्जे यांच्यात आधीच मतभेद निर्माण झाले होते. पत्रप्रकरणामुळे हा वाद उफाळून वर आल्याचे बोलले जात आहे. या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह वाढत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात नेतृत्व आणि संघटनात्मक बदलांबाबत विविध तर्कवितर्क व्यक्त होत आहेत.

COMMENTS