Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आयटीआयमध्ये पाटण येथील मनिष जाधव तालुक्यात प्रथम

पाटण / प्रतिनिधी : पाटण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा सन 2022 चा निकाल जाहीर झाला असून यामध्ये पाटण येथील मनिष संभाजी जाधव याने आयटीआय परिक्षेत इले

फलटणमध्ये वाळू वाहतुक तस्करावरावर कारवाई; 10 लाखांचा मुद्देमाल जप्त
केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे फार्मा तिर्थाटन !
लोणंद नगरपंचायतीसाठी 19 जण रिंगणात; पाच अपक्षांची माघार

पाटण / प्रतिनिधी : पाटण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा सन 2022 चा निकाल जाहीर झाला असून यामध्ये पाटण येथील मनिष संभाजी जाधव याने आयटीआय परिक्षेत इलेक्ट्रिशन (विजतंत्री) या ट्रेडमध्ये 600 गुणांपैकी 569 गुण (94.83) टक्के गुण मिळवून पाटण तालुक्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला.
मनिष जाधव याचे 10 वी पर्यंतचे शिक्षण पाटण येथील कै. ज्ञानोजीराव साळुंखे हायस्कूलमध्ये पुर्ण झाले. दहावी नंतर आयटीआय करण्याचा निर्णय त्याने घेतला. त्यामध्ये यश मिळविले. अभ्यासू, मेहनती, चिकाटी, जिद्दी असलेल्या मनिष जाधव याचे मुळ गाव पाटण तालुक्यातील कोयना विभागातील नवजा आहे. उदरनिर्वाहासाठी हे कुटुंब आलोरे येथे काही वर्षे वास्तव्यास होते. नंतर ते पाटण येथे भाड्याच्या खोलीत स्थायिक झाले. मनिष याच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी अपघात झाला होता. यातच ते आजारी होते. 10 महिन्यांपूर्वीच त्यांचे निधन झाले. आई संगिता जाधव हिने आलोरे पाटण येथे मोलमजुरी करून आपल्या दोन मुलांना शिकविले. तसेच अपघातात मार लागून आजारी असलेल्या पतीची सेवा करून खडतर परिस्थितीत कुटुंबाचा गाडा हाकला. मनिष याचा मोठा भाऊ यश याने आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून तो नोकरीच्या शोधात आहे. मनिष जाधव हा पाटण येथील पत्रकार संजय कांबळे यांचा भाचा आहे. असे तो नुकताच पुणे येथे एका कंपनीत रूजू झाला आहे. एकूण खडतर परिस्थितीत जिद्द, चिकाटी, मेहनत करून संपादन केलेल्या मनिषच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

COMMENTS