Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नुकसानीचे  तातडीने पंचनामे करावेत : औताडे 

कोपरगाव शहर :  कोपरगाव तालुक्यातील सर्व भागात सोमवारी झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठे नुकसान केलेले आहे. हाथा तोंडाशी आलेला घास न

अवकाळी पावसाने विटभट्टी व्यवसाय उद्ध्वस्त; संगमनेरमध्ये नुकसानीचे तातडीने पंचनामे करून मदत देण्याची मागणी
बेमोसमी अवकळा!
१० जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

कोपरगाव शहर :  कोपरगाव तालुक्यातील सर्व भागात सोमवारी झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठे नुकसान केलेले आहे. हाथा तोंडाशी आलेला घास नैसर्गिक संकटाने हिरावून घेतला आहे.   कृषी विभाग व महसूल विभागाने तातडीने शेतकऱ्यांच्या शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांनी केले आहे.

 अवकाळी पावसामुळे असंख्य शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीस आलेली पिके पावसाच्या पाण्यात भिजल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. पंचनामे झाल्यानंतर अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना निदान नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करता येईल.  काढणीस आलेल्या गहू, हरभरा, कांदा, टरबूज, आंबा, द्राक्षे तसेच इतर फळबाग पिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. जनावरांसाठी लागवड करण्यात आलेली मका व चारा पिके देखील पूर्णपणे नष्ट झालेले आहे . त्यामुळे ऐन उन्हाळ्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका पोहेगांव  परिसरात बसला आहे. अनेक शेतकऱ्यांचे गहू पिके जमीनदोस्त झाली आहे. तर शेतकऱ्यांनी शेतात काढलेला कांदा शेतातच भिजला आहे.

आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला अवकाळीने मोठे नुकसान केले आहे. सध्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी व दुहेरी सापडलेल्या संकटाचा सामना कसा करायचा हाच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे

यामुळे कोपरगाव तालुक्यातील महसूल व कृषी विभागाने तात्काळ शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त शेतामध्ये जाऊन पाहणी करून पंचनामे करावे व शासन दरबारी नुसकानीचा रिपोर्ट देऊन जास्तीत जास्त नुकसान भरपाई शेतकऱ्यांना कशी मिळेल या कामे सहकार्य करावे असेही नितीनराव औताडे यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

COMMENTS