Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नागवडे कारखान्याच्या संचालकपदी आळेकर

श्रीगोंदा : सहकार क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडीत सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना यांच्या संचालकपदी श्रीगोंदा नगरपालिकेचे माज

अहिल्यानगर जिल्हा डिफेन्स उत्पादनाचे मुख्य हब मुख्यमंत्री फडणवीस ; शिर्डीतील क्षेपणास्त्र संकुल आणि तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचे लोकार्पण
अरणगाव शाळेत पहिलीचा प्रवेशोत्सव उत्साहात
राहुरी तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी ऍड. तोडमल 

श्रीगोंदा : सहकार क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडीत सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना यांच्या संचालकपदी श्रीगोंदा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष एकनाथराव आळेकर यांची एकमताने निवड करण्यात आली.

कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन व संचालक बाबासाहेब भोस यांनी राजीनामा दिल्यामुळे संचालक मंडळातील सर्वसाधारण मतदारसंघ (श्रीगोंदा गट क्रमांक १) मधील एक जागा रिक्त झाली होती. या पार्श्वभूमीवर मा. सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, पुणे यांच्या मान्यतेने ही नैमित्तिक रिक्त जागा भरण्यासाठी ३० मार्च रोजी कारखाना कार्यस्थळावर विशेष बैठक पार पडली.

ही बैठक प्रादेशिक उपसंचालक (साखर) अहिल्यानगर तथा अध्यासी अधिकारी संजय गोंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यामध्ये संचालक लक्ष्मणराव रायकर यांनी एकनाथराव आळेकर यांच्या नावाची सूचना मांडली, तर श्रीनिवास घाडगे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर आळेकर यांची एकमताने निवड जाहीर करण्यात आली.

एकनाथराव आळेकर यांनी श्रीगोंदा नगरपालिका तसेच इंदिरा गांधी नागरी सहकारी पतसंस्थेमार्फत सामाजिक व सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. स्व. शिवाजीराव बापू नागवडे यांचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणूनही त्यांची ओळख आहे.

या निवडीबद्दल कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे, व्हा. चेअरमन मेघा औटी, संचालक मंडळ सदस्य तसेच अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे, दूध संघाचे चेअरमन दिलीप वागस्कर आदी मान्यवरांनी आळेकर यांचे अभिनंदन केले.

COMMENTS