Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतीप्रश्नी किसान सभेचा बीडला धडक मोर्चा;डॉ. अजित नवले शेतीप्रश्नी बीडमध्ये

बीड : पीकविमा, अतिवृष्टी अनुदान, गाळप केलेल्या ऊसाचे देयक आणि अतिवृष्टीत मृत्युमुखी पडलेले पशुधन नुकसान भरपाई या प्रश्नाला घेत अखिल भारतीय किसान

हॅरीसन फ्रान्सिस रेड्डी यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
दैनिक अल्हीलाल समूहाचा भव्य दिव्य पुरस्कार सोहळा 9 मे रोजीऑल इंडिया मुशायरा आणि वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरणही होणार
लिंबागणेश येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त अभिवादन

बीड : पीकविमा, अतिवृष्टी अनुदान, गाळप केलेल्या ऊसाचे देयक आणि अतिवृष्टीत मृत्युमुखी पडलेले पशुधन नुकसान भरपाई या प्रश्नाला घेत अखिल भारतीय किसान सभा बीड बुधवार दि 1 रोजी कलेक्टर कचेरीवर राज्य सचिव डॉ.अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढणार असल्याची माहिती किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष कॉ.ऑड.अजय बुरांडे यांनी दिली.
सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अभूतपूर्व अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील खरिप पीक मोठ्या प्रमाणात वाहून गेले, जमिनी खराडल्या गेल्या या प्रश्नी किसान सभेने जिल्हाधिकारी कार्यालय, आयुक्त कार्यालयावर मोर्चे काढले. या प्रश्नी साडेआठ हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान व रब्बी पिकांसाठी तीन हेक्टर मर्यादे पर्यंत प्रती हेक्टर दहा हजार रुपये अनुदान तर वाहून, खरडून गेलेल्या जमिनीसाठी रोजगार हमीच्या माध्यमातून मदत, पिकविमा धारक शेतकन्यांना झालेल्या पिकाचे नुकसान प्रति हेक्टर किमान साडेसतरा हजार रुपये प्रमाणे पिक विम्यातून देण्याची घोषणा केली.  या सर्व परिस्थितीत वर्ष संपले तरी पिक विमाधारक सर्व शेतकर्‍यांना पिकांच्या नुकसानीच्या प्रमाणात 17500 रु. पेक्षा जास्त अथवा अतिवृष्टी नुकसानाच धरतीवर घोषित केल्याप्रमाणे किमान 17500 रुपये सरसकट पिकविमा मिळावा, शासनाने घोषित केलेले अतिवृष्टी अनुदान सर्व वंचित शेतकर्‍यांना 15 दिवसांच्या आत सर्व अडचणींचे निराकरण करून मिळायलाच हवे, मागच्या तीन-चार महिन्यापासून जिल्ह्यातील विविध कारखान्यांनी गाळप केलेल्या उसाचे पैसे शेतकर्‍यांना दिलेले नाही ही ऊस बिलाची रक्कम पुढच्या आठ दिवसाच्या आत शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी, अतिवृष्टीमुळे वाहून गेलेल्या पशुधनाची नुकसान भरपाई मिळणे अजून बाकी आहे. त्यासाठी शासनाने अशा शेतकर्‍यांना घोषित केलेली मदत 10 एप्रिल पर्यंत वितरित करावी.या मागण्या घेत जिल्ह्यातील शेतकरी अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली बुधवार 1 एप्रिल 2026 रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर किसान सभेचे राज्य सचिव कॉ.डॉ.अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढणार असून या मोर्चात जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी मोठ्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन बीड किसान सभेने केले आहे.

COMMENTS