Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगाव तालुक्यात 26 सरपंच पदासाठी 85 उमेदवार रिंगणात

26 ग्रामपंचायतीच्या सदस्यपदासाठी 571 उमेदवारांमध्ये होणार लढत

कोपरगाव प्रतिनिधी - कोपरगाव तालुक्यातील 26 ग्रामपंचायत च्या निवडणुकीसाठी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी सरपंच पदासाठी 74 तर सदस्य पदासाठी 291 उ

जामनेर तालुक्यातील १२ पैकी ९ ग्रामपंचायती भाजपाच्या ताब्यात
सर्वात मोठ्या तुंगत ग्रामपंचायत मध्ये सत्ता परिवर्तन
जिल्ह्यात शिंदे गटाचे 17 जागांवर उमेदवार विजयी

कोपरगाव प्रतिनिधी – कोपरगाव तालुक्यातील 26 ग्रामपंचायत च्या निवडणुकीसाठी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी सरपंच पदासाठी 74 तर सदस्य पदासाठी 291 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहे दरम्यान दुपारनंतर कोपरगाव तहसील कार्यालय निवडणूक प्रशासनाकडून उमेदवारांना बुधवार दिनांक 7 डिसेंबर 2022 सायंकाळपर्यंत निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले.


आता थेट प्रचाराला सुरुवात झाली असून यामध्ये भोजडे ग्रामपंचायत सदस्य पदासाठी 18 उमेदवार तर सरपंच पदासाठी 5 उमेदवार रिंगणात आहे. सडे ग्रामपंचायत सदस्य पदासाठी 14 उमेदवार रिंगणात असून 2 उमेदवार सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी रिंगणात उभे आहेत, तर शिंगणापूर सदस्य पदासाठी 35 तर सरपंचपदासाठी 2, वेस सोयगाव सदस्य पदासाठी 25 उमेदवार असून सरपंचपदासाठी 3 उमेदवार रिंगणात आहे. कोळपेवाडी ग्रामपंचायत सदस्य पदासाठी 29 उमेदवार तर 3 उमेदवार सरपंच पदासाठी रिंगणात आहे. वडगाव ग्रामपंचायत सदस्य पदासाठी 21 उमेदवार रिंगणात असून 3 उमेदवार सरपंच पदासाठी रिंगणात उभे आहे. मोर्विस ग्रामपंचायत सदस्य पदासाठी 12 उमेदवार रिंगणात असून 3 उमेदवार सरपंच पदासाठी रिंगणात उभे आहे. खिर्डी गणेश ग्रामपंचायत सदस्यपदासाठी 27 उमेदवार रिंगणात असून 6 उमेदवार सरपंच पदासाठी रिंगणात उभे आहे. पढेगाव ग्रामपंचायत सदस्य पदासाठी 28 उमेदवार रिंगणात असून 5 उमेदवार सरपंच पदासाठी रिंगणात उभे आहे. चासनळी ग्रामपंचायत सदस्य पदासाठी 33 उमेदवार उमेदवार रिंगणात असून 6 उमेदवार सरपंच पदासाठी रिंगणात उभे आहे. माहेगाव देशमुख ग्रामपंचायत सदस्य पदासाठी 27 उमेदवार रिंगणात असून सरपंच पदासाठी 3 उमेदवार रिंगणात उभे आहे. राजनगाव देशमुख ग्रामपंचायत सदस्य पदासाठी 22 उमेदवार रिंगणात उभे असून सरपंच पदासाठी 2 उमेदवार रिंगणात उभे आहे. शहापूर ग्रामपंचायत सदस्य पदासाठी 14 उमेदवार तर सरपंच पदासाठी 3 उमेदवार रिंगणात उभी आहे. बहाद्राबाद ग्रामपंचायत सदस्य पदासाठी 15 उमेदवार रिंगणात उभे असून 2 उमेदवार सरपंच पदासाठी रिंगणात उभे आहे. डाऊच बुद्रुक ग्रामपंचायत सदस्य पदासाठी 14 उमेदवार रिंगणात असून सरपंच पदासाठी 3 उमेदवार रिंगणात उभे आहे. डाऊच खुर्द ग्रामपंचायत सदस्य पदासाठी 36 उमेदवार रिंगणात असून सरपंच पदासाठी 4 उमेदवार रिंगणात उभे आहे. देर्डे कोर्‍हाळे ग्रामपंचायत सदस्य पदासाठी 19 उमेदवार रिंगणात उभे असून सरपंच पदासाठी 2 उमेदवार रिंगणात उभी आहे. तळेगाव मळे ग्रामपंचायत सदस्यपदासाठी 18 उमेदवार रिंगणात उभे असून 3 उमेदवार सरपंच पदासाठी रिंगणात उभे आहे. चांदेकासारे ग्रामपंचायत सदस्य पदासाठी 27 उमेदवार रिंगणातून असून सरपंच पदासाठी 4 उमेदवार रिंगणात उभे आहे तर धारणगाव ग्रामपंचायत सदस्य पदासाठी 22 उमेदवार रिंगणात उभे असून सरपंच पदासाठी 4 उमेदवार रिंगणात उभे आहे. हांडेवाडी ग्रामपंचायत सदस्य पदासाठी 12 उमेदवार रिंगणात उभे असून सरपंच पदासाठी 3 उमेदवार रिंगणात उभे आहे. बक्तरपूर ग्रामपंचायत सदस्य पदासाठी 14 उमेदवार तर सरपंच पदासाठी 2 उमेदवार रिंगणात उभी आहे. सोनेवाडी सदस्य पदासाठी 27 उमेदवार तर सरपंच पदासाठी 3 उमेदवार रिंगणात उभे आहे. खोपडी ग्रामपंचायत सदस्य पदासाठी 11 उमेदवार तर सरपंच पदासाठी 4 उमेदवार रिंगणात उभे आहे. करंजी बुद्रुक ग्रामपंचायत सदस्य पदासाठी 32 उमेदवार रिंगणात असून सरपंच पदासाठी 3 उमेदवार रिंगणात उभे आहे. बहादरपूर ग्रामपंचायत सदस्य पदासाठी 19 उमेदवार रिंगणात उभे असून सरपंच पदासाठी 2 उमेदवार रिंगणात उभे आहे. अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी बुधवारी कोपरगाव तहसील कार्यालयाच्या आवारात 26 ग्रामपंचायत गावातील लोकांची परिसरात तोबा गर्दी जमली होती अखेर सर्व प्रक्रिया सायंकाळी शांततेत पार पडली.

COMMENTS