सर्वात मोठ्या तुंगत ग्रामपंचायत मध्ये सत्ता परिवर्तन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सर्वात मोठ्या तुंगत ग्रामपंचायत मध्ये सत्ता परिवर्तन

काँग्रेसचे प्रकाश पाटील यांची सत्ता

पंढरपूर प्रतिनिधी - पंढरपूर तालुक्यातील सर्वात मोठ्या असलेल्या तुंगत ग्रामपंचायती मध्ये सत्ता परिवर्तन झाले असून येथे काँग्रेसचे नेते प्रकाश पाटील

बुलढाण्यातील 259 ग्रामपंचायतीचा 80.47 टक्के मतदान
चोपडा तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींसाठी 73 टक्के मतदान
उस्मानाबाद तालुक्यात आमदारांनी राखला गड,

पंढरपूर प्रतिनिधी – पंढरपूर तालुक्यातील सर्वात मोठ्या असलेल्या तुंगत ग्रामपंचायती मध्ये सत्ता परिवर्तन झाले असून येथे काँग्रेसचे नेते प्रकाश पाटील यांच्या गटाने सत्ता मिळवली आहे. भाजपाचे माजी आमदार प्रशांत परिचारक गटाचा सुपडासाफ झाला आहे. सरपंचपदासह 13 जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. डॉ अमृता रणदिवे या सरपंचपदी निवडून आल्या आहेत. पंचायतीच्या निवडणूक निकालाकडे संपूर्ण पंढरपूर तालुक्याचे लक्ष लागले होते. तालुक्यातील 11 ग्रामपंचायत पैकी 6 ग्रामपंचायतीमध्ये  राष्ट्रवादी पुरस्कृत आघाडीची सत्ता आली तर तुंगत मध्ये काॅग्रेसचे नेते प्रकास पाटील  या यांची सत्ता आली आहे.

COMMENTS