Homeताज्या बातम्यादेश

तिसर्‍या टप्प्यातील प्रचारतोफा थंडावल्या

देशातील 94 लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान

नवी दिल्ली ः लोकसभा रणधुमाळीचा तिसर्‍या टप्प्यातील प्रचारतोफा रविवारी थंडावल्या असून, देशातील 94 लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी 7 मे रोजी मतदान हो

आघाडी धर्मावरून ‘मविआ’त नाराजीनाट्य !
वडिलांची जबाबदारी स्वीकारत गौतमी पाटीलने घेतला मोठा निर्णय
दुकानासमोर लावलेल्या मोटारसायकलची चोरी

नवी दिल्ली ः लोकसभा रणधुमाळीचा तिसर्‍या टप्प्यातील प्रचारतोफा रविवारी थंडावल्या असून, देशातील 94 लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी 7 मे रोजी मतदान होणार आहे. मात्र त्यापूर्वीच रविवारी प्रचारतोफा थंडावल्या आहेत. लोकसभेच्या तिसर्‍या टप्प्यासाठी 12 राज्यांमधील 94 मतदारसंघांसाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे.
तिसर्‍या टप्प्यासाठी देशातील 12 राज्यांमध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, गोवा, पश्‍चिम बंगाल, जम्मू आणि काश्मीर आणि दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. तिसर्‍या टप्प्यात बर्‍याचश्या मतदार संघात चुरशीच्या लढती होत आहे. बारामती लोकसभेचाही यात समावेश आहे. बारामतीत आज शरद पवार आणि अजित पवार सांगता सभा घेणार आहेत. दरम्यान या 11 मतदार संघात नरेंद्र मोदी, अमित शहा, राहुल गांधी, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी प्रचाराचा धुरळा उडवला होता.  तिसर्‍या टप्प्यात अकरा मतदार संघात मतदान होणार आहे. यात रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या लोकसभा मतदार संघांचा समावेश आहे. यातील बारामती लोकसभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इथली लढत ही सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार अशी आहे. दोन्ही पवार एकमेकाच्या विरोधात ठाकरे आहे. त्यामुळे राज्याचेच नाही तर देशाचे लक्ष या लढतीकडे आहे.

दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला – महाराष्ट्रातील 12 लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मंगळवारी मतदान होत असून, यासाठी रविवारी प्रचारतोफा थंडावल्या असल्या तरी या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. बारामतीमध्ये शरद पवार यांच्यासह अजित पवार तर सोलापुरात सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यामध्ये शाहू महाराज, उदयन राजे भोसले, नारायण राणे, प्रणिती शिंदे यांचे भवितव्य ठरणार आहे. शिवाय सुनिल तटकरे, अनंत गिते, ओमराजे निंबाळकर, धैर्यशिल मोहिते पाटील, यांच्याही भवितव्याचा फैसला होणार आहे.

’सुपरसंडे’ ठरला प्रचाराचा – रविवारी अनेक दिग्गज नेत्यांनी आपल्या प्रचारसभेची सोमवारी सांगता केली. रविवार असल्याने राज्यात प्रचाराचा ’सुपरसंडे’ पाहायला मिळाला. बारामतीमध्ये खासदार शरद पवारांची सांगता सभा झाली. तर दुसरीकडे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी कोल्हापुरात तर धैर्यशील माने यांच्यासाठी इचलकरंजीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दुचाकी रॅली काढण्यात आली होती. महाविकास आघाडीकडून कोल्हापूरात घरोघरी जात प्रचारफेरी काढण्यात आली होती. यामध्ये आमदार सतेज पाटील, ऋतुराज पाटील, जयश्री जाधव, माजी खासदार संभाजीराजे, माजी आमदार मालोजीराजे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी सहभागी झाले होते.

COMMENTS