Homeताज्या बातम्यादेश

नेपाळच्या महापौरांची मुलगी गोव्यातून बेपत्ता

गोवा प्रतिनिधी - नेपाळमधील एक तरुणी गोव्यात बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली होती. ही तरुणी नेपाळच्या धनगढी उप-महानगर शहराचे महापौर गोपाल हमाल

युवतीच्या वैद्यकीय उपचारांसाठी शिवसेना नगरसेवकांची मदत
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळ निवडणूक ऑक्टोबरमध्ये होणार
महाराष्ट्र केसरीस पै. संजय पाटलांच्या स्मरणार्थ एक लाखाचे बक्षीस जाहीर

गोवा प्रतिनिधी – नेपाळमधील एक तरुणी गोव्यात बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली होती. ही तरुणी नेपाळच्या धनगढी उप-महानगर शहराचे महापौर गोपाल हमाल यांची मुलगी आहे. आरती गेल्या अनेक महिन्यांपासून गोव्यात असून, ओशो मेडिटेशन सेंटरसह काम करत होती. पण गेल्या काही दिवसांपासून ती बेपत्ता झाली होती. सोमवारी रात्री 9.30 वाजता अश्वेम ब्रीजजवळ तिला अखेरचं पाहण्यात आलं होतं. पण अखेर पोलिसांना तिचा शोध लावण्यात यश आलं आहे. गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरती हमाल उत्तर गोव्यातील एका हॉटेलमध्ये सापडल्याची माहिती दिली आहे. 

ओशोंच्या मेडिटेशन सेंटरमध्ये सहभागी होण्यासाठी पोहोचलेल्या आरती हमालशी कोणताही संपर्क होत नव्हता. यानंतर तिच्या वडिलांनी काठमांडूतील भारतीत दुतावासाच्या मदतीने गोवा पोलिसांशी संपर्क साधला होता. गोवा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत सर्च ऑपरेशन सुरु केलं होतं. तसंच गोपाल हमाल यांनी फेसबुकवर पोस्ट लिहित आपल्या मुलीला शोधून काढण्याचं आवाहन केलं होतं. त्यांनी गोवा सरकार आणि पोलिसांकडे मुलीला शोधण्यासाठी विनंती केली होती.

काही लोकांची खूप मदत झाली आहे आणि आम्ही त्यांचे सदैव ऋणी आहोत. काही कॉलर्सच्या म्हणण्यानुसार ती शेवटची सिओलिम जवळील एका पुलावर पाहिली गेली होती. त्यांच्यापैकी काही जणांचं म्हणणं आहे की, बेशुद्ध झाल्याने तिला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आलं होते. तर इतर सांगत आहेत की तिला पोलीस ठाण्यात नेण्यात आले,” अशी माहिती आरतीची बहिण आरजूने फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं होतं. दरम्यान दुतावासाने मध्यस्थी केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तिचा शोध सुरु केला होता. पोलिसांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी अखेर आरती हमालला शोधून काढलं आहे. 

COMMENTS