Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लगीनघाई, उन्हाळी सुट्यांमुळे रेल्वे, बसेसला गर्दी

लातूर प्रतिनिधी - लग्नसराई, उन्हाळी सुट्यांमुळे सध्या रेल्वे, बेसस आणि खाजगी प्रवासी वाहनांना ब-यापैकी गर्दी आहे. उन्हाळा तापदायक ठरत असला तरी लग

बियाणे, खते विक्रीत लिंकिंग केल्यास कठोर कारवाई होणार
भीमजयंती दिनी डॉ.फुगारे यांच्या उपस्थितीत  पाणीवाटपाचे आयोजन
भरधाव वाहनाच्या धडकेत पती-पत्नीचा मृत्यू

लातूर प्रतिनिधी – लग्नसराई, उन्हाळी सुट्यांमुळे सध्या रेल्वे, बेसस आणि खाजगी प्रवासी वाहनांना ब-यापैकी गर्दी आहे. उन्हाळा तापदायक ठरत असला तरी लग्न सोहळे, सहलीवर जाणा-या प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे प्रवासी वाहने फुल्ल आहेत. सध्या शाळा, महाविद्यालयांना सुट्या आहेत. त्यामुळे सहलीवर जाणा-या प्रवाशांची ब-यापैकी संख्या आहे. त्यातच लग्न सोहळे धुमधडाक्यात पार पडत असल्यामुळे या सोहळ्यांसाठी जाणा-या-येणा-या पाहूण्यांचीही संख्या वाढली आहे. आप्तेष्ट, नातेवाईम, मित्र परिवारास लग्न सोहळयासह अन्य कार्यक्रमांना उपस्थित राहाता यावे यासाठी बहुतांश नागरिक उन्हाळ्याच्या सुटीत कार्यक्रमाची आखणी करीत आहेत. यादरम्यान बसेस, रेल्वे, खाजगी वाहनांना प्रचंड गर्दी होते. सध्या सर्वच प्रवासी वाहनांना गर्दी आहे. उन्हाळी सुटीचा बेत साधून बरेच जण सहलीवर जाण्याचे नियोजन करीत आहे. वाढत्या उन्हामुळे थंड हवेच्या ठिकाणी जाण्यास प्राधान्य दिले जात आहे. तसेच विविध देवस्थानलाही जाणा-यांची संख्या ब-यापैकी आहे. सहलीवर जाण्यासाठी खाजगी वाहनांसह बस, रेल्वेचे आरक्षण आवश्यक असते. ते मिळविण्यासाठी गेल्या दोन, तीन महिन्यांपासून नागरिक नियोजन करतात. त्यामुळे सर्वत्र हाऊसफुल्ल, असे फलक पाहायला मिळत आहेत. बस स्थानक, रेल्वे स्थानक, खाजगी वाहनांच्या पॉईटला प्रवाशांची मोठी गर्दी असल्याचे दिसून येत आहे. अशी गर्दी आता 15 जूनपर्यंत राहण्याची शक्यता आहे. वर्षभर नोकरी, उद्योग, व्यवसाय करणारे कुटूंबासह बाहेर गावी जाणे, कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. तसेच नोकरी, व्यवसायाच्या शहरातून गावाकडे येणा-यांचाही लोंढा वाढला आहे.

COMMENTS