HomeUncategorized

81 व्या औंध संगीत महोत्सवास दिमाखात प्रारंभ

औंध : 81 व्या औंध संगीत महोत्सवात सादरीकरण करताना कलाकार. हजारो रसिक श्रोत्यांनी घेतला संगीत महोत्सवाचा ऑनलाईन लाभ!औंध / वार्ताहर : 81 व्या औंध सं

कुस्तीच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी मल्लांना पोरे कुटुंबियांकडून 10 हजार रुपयाची मदत
काटवली येथील पांचगणी मार्गावरील जुना दगडी पुल बनला धोकादायक
भाजपला शिराळ्यात खिंडार माजी मंत्री करणार राष्ट्रवादीत प्रवेश; खा. शरद पवार यांच्याशी चर्चेत नाईक यांचा राष्ट्रवादी प्रवेशावर शिक्कामोर्तब
औंध : 81 व्या औंध संगीत महोत्सवात सादरीकरण करताना कलाकार.

हजारो रसिक श्रोत्यांनी घेतला संगीत महोत्सवाचा ऑनलाईन लाभ!
औंध / वार्ताहर : 81 व्या औंध संगीत महोत्सवाचे ऑनलाईन प्रक्षेपण रविवारी शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानच्या युट्यूब चॅनल व औंध संगीत महोत्सव या फेसबूक पेजवर हजारो रसिक श्रोत्यांच्या उपस्थितीत झाले.
उत्सवातील पहिल्या सत्राची सुरुवात शास्त्रीय गायक मयूर महाजन यांनी राग नटभैरवच्या गायनाने केली. यात त्यांनी विलंबित एकताल मध्ये ’गुंज रहि कीरत तुम्हरी’ आणि ’भोर भई पंछी जागे’अशा 2 बंदिशींचे सादरीकरण केले. द्रुत तीनताल मधील सूरज चंदा ही पं. सी. आर. व्यास यांची बंदिश सादर केली.
त्यानंतर राग परमेश्‍वरीमध्ये मयूर महाजन यांचे गुरू डॉ. मोहन दरेकर रचित देवी दयानी भगवती ही बंदिश सादर केली. त्यांना तबल्यावर सौरभ क्षीरसागर व हार्मोनियमवर अभिनय रवंदे यांनी साथ केली. डॉ. चैतन्य कुंटे यांनी प्रथम राग गुजरी तोडीमध्ये विलंबित आडाचौताल, मध्य लय एकताल व द्रुत तीनताल यात स्वरचित गती पेश केल्या. त्यानंतर राग लाचारी तोडीमध्ये मध्यलय रूपक तालात स्वरचित रचनेचे वादन केले. त्यानंतर राग सिंहेंद्रमध्यममध्ये पंजाबी तालात स्वरचित टप्पा सादर केला. त्यांना तबल्यावर विभव खांडोळकर यांनी साथ केली. सकाळच्या सत्राची सांगता श्रीमती मंजिरी आलेगावकर यांच्या गायनाने झाली. यांनी राग जौनपुरी मध्ये हूँ तो जैयो ही विलंबित तीनतालमधील बडाख्याल पेश केला. त्याला जोड म्हणून हरदम मौला तेरो नाम ही मध्य तीनतालमधील बंदिश सादर केली.
राग शुध्द सारंगमध्ये ख्वाजा दिन ही विलंबित झपतालमधील रचना व हे पथकवा, ही द्रुत एकतालातील बंदिश, अशा दोन बंदिशी सादर केल्या. सादरीकरणाची सांगता पं. कुमार गंधर्व यांनी संगीतबध्द केलेले ’सुनता है गुरूज्ञानी’ या कबिर भजनाने केली. त्यांना तबल्यावर अजित किंबहुने व हार्मोनियम वर सौरव दांडेकर यांनी साथ केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानच्या सहसचिव अपूर्वा गोखले, पल्लवी जोशी, सुनील पवार यांनी केले. सायंकाळी उशीरा औंध संगीत महोत्सवाचे दुसरे सत्र सुरू झाले.

COMMENTS