Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्मकांडांना फाटा देत महात्मा जोतिबा फुले यांच्या सत्यशोधकी विचाराने रक्षाविसर्जन

साखराळे : रक्षा झाडांना विसर्जित करताना त्यांचा नातू संकेत पाटील व जावई राजेंद्र पाटील. समवेत आनंदराव पाटील, ए. डी. पाटील, दादासो पाटील, सदानंद पाटील

वीज चोरांविरुध्द कडक मोहीम राबविण्याचे निर्देश
महाविकास आघाडीला स्वाभिमानी राम राम ठोकण्याच्या पवित्र्यात
मदनगरमध्ये बिल दाखवल्याशिवाय रुग्णांना रेमडेसीव्हीर देणार नाही | ‘१२ च्या १२ बातम्या’ | Lok News24

इस्लामपूर / प्रतिनिधी : साखराळे (ता. वाळवा) येथील श्रीमती मिराबाई रामचंद्र पाटील (वय 76) यांचे रक्षा विसर्जन व कार्यविधी सर्व कर्मकांडांना फाटा देत महात्मा जोतिबा फुले यांच्या सत्यशोधकी विचाराने करण्यात आला. आई-वडिलांची आपल्या नातेवाईकांची जिवंतपणी सेवा करा. मेल्यानंतर पाटीभर नैवेद्य, अनावश्यक कर्मकांडे आणि खर्च बंद करूया, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. येथील स्वातंत्र्य सेनानी स्व. शामराव पाटील लोकविकास मंडळ व मराठा सोशल ग्रुप सांगली यांच्या पुढाकाराने हा विधी करण्यात आला. या विधीची गावात चर्चा सुरू आहे.
साखराळे येथील स्मशानभूमीत श्रीमती मिराबाई पाटील यांच्या रक्षांचे पूजन करून भाजी, भाकरी, दूध व दही असा नैवेद्य दाखविण्यात आला. कावळ्याने नैवेद्य शिवण्याची वाट पाहिली नाही. मुंडण केले नाही, दुखवटा केला नाही. भडजी, गुरव आणि बाराबलुतेदार यांच्याशिवाय हा विधी करण्यात आला. शेवटी नातू संकेत राजेंद्र पाटील व जावई राजेंद्र जयसिंग पाटील यांच्यासह नातेवाईक व गावातील मान्यवरांच्या हस्ते रक्षा झाडांना विसर्जित करण्यात आल्या. सर्व विधी 3 दिवसात करण्यात आले.
यावेळी मराठा सोशल ग्रुपचे ए. डी. पाटील सांगली, प्रा. डॉ. विजय गायकवाड, शंकरराव मोहिते आष्टा, आर. एस. पाटील यांनी प्रबोधनपर मार्गदर्शन केले. त्यांनी उपस्थितांना सत्यशोधक विचारांची शपथ शपथ दिली. महात्मा जोतिबा फुले यांनी आपणास जो विचार दिला आहे. त्या विचाराने पुढे जाण्यात समाजाचे भले आहे. आज महागाईने माणसाला जगणे मुश्कील झाले असताना अनावश्यक कर्मकांडे आणि खर्च कमी करायला नको का? 13 दिवस कुटुंब, भावकी आणि नातेवाईकांनी घरी बसणे आजच्या काळात योग्य आहे का? आपण सर्वांनी समाजाचे प्रबोधन करायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी बाजार समितीचे माजी सभापती आनंदराव पाटील, इफकोचे माजी संचालक अशोक पाटील, माजी नगरसेवक सदानंद पाटील, माजी उपसरपंच दादासो पाटील, सुनील पाटील, युवक राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष विनोद बाबर, जवाहर वाचनालयाचे अध्यक्ष शशिकांत पाटील, सचिन बाळासाहेब पाटील, पांडुरंग बाबर, रणजित पाटील, अर्जुन कचरे यांच्यासह नातेवाईक व ग्रामस्थ उपस्थित होते. स्वातंत्र्य सेनानी स्व. शामराव पाटील लोकविकास मंडळाचे अध्यक्ष जयकर पाटील, विजय रामचंद्र पाटील यांनी विधीचे नियोजन केले.

COMMENTS