Homeताज्या बातम्यामनोरंजन

मलायकाने शेअर केला अर्जुनचा न्यूड फोटो

मुंबई प्रतिनिधी - बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या सोशल मीडिया पोस्टमधून नेहमीच बॉयफ्रेंड अर्जुन कपूरवर भरभरून प्रेम व्यक्त करताना दिसते

शेवगावमध्ये पाच हजार घरकुले रद्द होण्याची शक्यता; ३१ मार्चपर्यंत बांधकाम सुरू न केल्यास कारवाई; पंचायत समितीचा इशारा
राज्यात कायद्याचे नव्हे, ‘काय ते द्या’चे राज्य : फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
भाजपचे आमदार टेकचंद सावरकर यांच्या डान्सचा व्हीडीओ व्हायरल

मुंबई प्रतिनिधी – बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या सोशल मीडिया पोस्टमधून नेहमीच बॉयफ्रेंड अर्जुन कपूरवर भरभरून प्रेम व्यक्त करताना दिसते. या कपलमधील बॉन्डिंग पाहून त्यांचे चाहते प्रचंड खूश होतात. अर्जुन आणि मलायका हे कपल सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते आणि नेहमीच आपले नवनवे फोटो शेअर करत असते. मात्र, नुकताच मलायकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून अर्जुनचा असा एक बोल्ड फोटो शेअर केला आहे, की ज्यामुळे इंटरनेट विश्वाचा पारा चांगलाच वाढला आहे. या फोटोमध्ये अर्जुन कपूरने केवळ एका उशीने आपले शरीर झाकले आहे. मलायका अरोराने रविवारी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूर सोफ्यावर बसून आळस देताना दिसत आहे. मात्र, या फोटोमध्ये त्याने कपडे परिधान केलेले नाहीत. तर, केवळ एका लहान उशीने आपले शरीर झाकले आहे. अर्जुन कपूरचा हा फोटो जरी ब्लॅक अँड व्हाईट असला, तरी या फोटोने सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडवली आहे. अर्जुन कपूरचा टॅटूही या फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे. मलायका अरोराने हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, ‘माझा अतिशय आळशी मुलगा’. अर्जुन कपूरने त्याच्या इन्स्टा स्टोरीवर या पोस्टचा स्क्रीनशॉटही पोस्ट केला आहे. मात्र, मलायका अरोरा हिने हा फोटो शेअर केल्यानंतर आता ती चांगलीच ट्रोल होत आहे. नेटकरी या फोटोवरून मलायकाची खिल्ली उडवताना दिसत आहेत. तर, काहींनी तिला दोघांच्या वयातील अंतर लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला आहे. काहींनी मलायकावर वेगवगेळ्या कमेंट्स केल्या आहेत. मात्र, नेहमीप्रमाणेच तिने या सगळ्यांना धुडकावून लावले आहे. अर्जुन आणि मलायका बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मलायका अरोराने अर्जुन कपूरवर प्रेमाचा वर्षाव करण्याची ही पहिलीच वेळ नाही. बी टाऊनची ही जोडी अनेकदा एकमेकांवरील प्रेम व्यक्त करताना दिसते. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा गेल्या चार वर्षांहून अधिक काळ एकमेकांना डेट करत आहेत

COMMENTS