Homeताज्या बातम्याअन्य जिल्हे

साहित्य भारतीच्या जिल्हाध्यक्षपदी बापू दासरी, कार्याध्यक्षपदी रोहिणी पांडे यांची निवड

अखिल भारतीय साहित्य परिषद ही देशातील बावीस भारतीय भाषांमध्ये कार्यरत असलेली राष्ट्रीय स्तरावरील एक महत्त्वपूर्ण साहित्य संघटना असून महाराष्ट्रात

ऑनलाइन औषध विक्रीवर लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारचे सकारात्मक पाऊलखा. डॉ. अजित गोपछडे यांच्या पाठपुराव्याला यश
रायचूर एक्सप्रेसमध्ये चोरीचा प्रयत्न फसलाधाडसी महिलेच्या प्रसंगावधानाने चोरट्याचा डाव उधळला; रेल्वे सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणार्‍यांना कठोर शिक्षा द्या; मोटेगावकरांवर मकोका लावून आरसीसी कायमचे बंद करण्याची मागणीनीट पेपरफुटी प्रकरणाने नांदेड हादरले; सर्व मोठ्या कोचिंग क्लासेसची सीबीआय चौकशी करण्याची मागणी



अखिल भारतीय साहित्य परिषद ही देशातील बावीस भारतीय भाषांमध्ये कार्यरत असलेली राष्ट्रीय स्तरावरील एक महत्त्वपूर्ण साहित्य संघटना असून महाराष्ट्रात ती साहित्य भारती या नावाने कार्यरत आहे. देवगिरी प्रांत व महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या संयुक्त बैठकीत नांदेड जिल्ह्याची नवीनं कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली.
या कार्यकारिणीत माजी समाजकल्याण अधिकारी बापू दासरी यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून रोहिणी पांडे यांच्यावर कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच उपाध्यक्षपदी डॉ. सुनील कुलकर्णी व संध्या वळंकीकर, संघटनमंत्री म्हणून पंडित पाटील, सहमंत्रीपदी अनुराधा पत्की यांची नियुक्ती करण्यात आली आहे. युवा साहित्य विभाग प्रमुखपदी डॉ. स्वाती भद्रे, महिला साहित्य विभागप्रमुख म्हणून निशा डांगे व प्रीती नांदेडे, तर कार्यालय प्रमुख म्हणून किर्ती पाटील यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय ज्येष्ठ साहित्यिक आशाताई पैठणे आणि सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ. दीपक कासराळीकर यांची प्रमुख मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नव्या कार्यकारिणीमुळे जिल्ह्यातील साहित्यिक चळवळीला नवे बळ मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे. राष्ट्रीय विचारांचे साहित्य समाजात रुजवणे, नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, समाजात नीतिमूल्यांची जपणूक करणे, पर्यावरण जागरूकता निर्माण करणे तसेच वाचन संस्कृतीला चालना देणे अशा विविध उपक्रमांवर साहित्य भारती पुढील काळात विशेष भर देणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या निवडीबद्दल प्रदेश संघटन मंत्री नितीन केळकर, प्रदेश कार्याध्यक्ष शशिकांत घासकडबी, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. रवींद्र बेंबरे, देवगिरी प्रांताध्यक्ष सर्जेराव जिघे, कार्याध्यक्ष उमेश काळे, प्रांत महामंत्री युवराज नाळे तसेच उपाध्यक्ष राजीव यशवंते यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

COMMENTS