Homeताज्या बातम्याअन्य जिल्हे

’पत्रकारीते’च्या आडून जुगाराचा डाव!माजी शिक्षणाधिकार्‍यांसह बड्या धेंडांवर पोलिसांची धाड; 9 जुगारमल्ले गजाआड

 गेल्या अनेक वर्षांपासून रेती, मटका आणि जुगाराचा काळा व्यवसाय स्वतःच्या फायद्यासाठी उजळमाथ्याने सुरू होता. समाजाला पोखरणार्‍या या समाजविघातक व्यव

९० किलो गांजा 17 लाखांच्या मुद्देमालासह ३ जणांना अटक, गुन्हे शाखेची कारवाई
नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; 30 लाखांचा गुटखा जप्त, आरोपी अटकेत
’मकोका’मधील फरार आरोपीला पोलिसांनी सिनेस्टाईलने केली अटक



 गेल्या अनेक वर्षांपासून रेती, मटका आणि जुगाराचा काळा व्यवसाय स्वतःच्या फायद्यासाठी उजळमाथ्याने सुरू होता. समाजाला पोखरणार्‍या या समाजविघातक व्यवसायाला काहींनी चक्क ’पत्रकारितेची ढाल’ करून कायदेशीर संरक्षण देण्याचा प्रयत्न केला. पण, पाप कधी ना कधी उघड होतंच! अखेर किनवट पोलीस प्रशासनाने या तथाकथित पत्रकाराचा खरा चेहरा समाजासमोर आणत, त्याच्या घरात चालणार्‍या ’हायप्रोफाइल’ जुगार अड्ड्याचा पर्दाफाश केला आहे.
गोकुंदा गावच्या दत्तनगरात 16 मे च्या रात्री किनवट पोलिसांनी टाकलेल्या या नियोजनबद्ध धाडीमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईत माजी शिक्षणाधिकारी, कंत्राटदार आणि स्वतःला पत्रकार म्हणवून घेणार्‍या घरमालकासह एकूण 9 जुगारमल्लांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. 16 मे च्या रात्री गोकुंदा शहरातील दत्तनगर भागात राहणारे तथाकथित पत्रकार गौतम बेलाजी येरेकर यांच्या टीनशेडमध्ये पैशांची पैजा आणि पत्त्यांचा डाव रंगात आला होता. किनवट पोलीस ठाण्याच्या पथकाने दबा धरून बसत या अड्ड्यावर अचूक छापा टाकला. पोलीस दारात उभे ठाकताच जुगारमल्लांची पळापळ झाली, पण पोलिसांनी चहूबाजूंनी घेरल्यामुळे कोणालाही पळ काढता आला नाही. पोलिसांनी घटनास्थळावरून ज्या बड्या धेंडांना ताब्यात घेतले आहे, त्यांची नावे आणि तपशील पुढीलप्रमाणे आहे.गौतम बेलाजी येरेकर (वय 70 वर्ष) व्यवसाय: पत्रकार, रा. दत्तनगर, गोकुंदा (अड्डा मालक), आनंदराव सखाराम वाढे (वय 75 वर्ष) व्यवसाय: सेवानिवृत्त शिक्षण अधिकारी, रा. घोटी, नागोराव गंगाराम रापनवार (वय 55 वर्ष) व्यवसाय: शेती, रा. राजगडतांडा, असद खान मेहबूब खान (वय 58 वर्ष) – व्यवसाय: व्यापार, रा. शिवाजीनगर, किनवट, राम जयराम राठोड (वय 60 वर्ष) व्यवसाय: शेती, रा. मळकापूर, सुरेश पांडुरंग माने (वय 60 वर्ष) व्यवसाय: शेती, रा. रामनगर, किनवट, अनिल कराळे (वय 40 वर्ष) व्यवसाय: शेती, रा. कमठाला, दत्ता उद्धव कसबे (वय 48 वर्ष) व्यवसाय: कंत्राटदार/इतर, रा. घोटी, दाऊद सुलेमान चव्हाण (वय 58 वर्ष) व्यवसाय: मजुरी, रा. समतानगर, किनवट. या कारवाईत पोलिसांनी जुगाराच्या डावावरून आणि आरोपींकडून  रोख रक्कम: 64 हजार 900 रुपये.मोबाईल: 74 हजार रुपये किमतीचे एकूण 9 मोबाईल.वाहने: 2 लाख 85 हजार रुपये किमतीच्या एकूण 6 मोटार सायकली (यात एक 80 हजारांची रॉयल एनफिल्ड बुलेट, स्कूटी आणि इतर दुचाकींचा समावेश आहे).एकूण जप्त ऐवज: 4 लाख 23 हजार900 रुपये. मुद्देमाल हस्तगत केला आहे. या धडक कारवाईनंतर किनवटचे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी शहरातील इतर अवैध धंदेवाल्यांना थेट आणि कडक शब्दांत इशारा दिला आहे: शहरात मटका, जुगार, दारू विक्री यांसारखे कोणतेही अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाहीत. अशा समाजविघातक प्रवृत्तींचे समूळ उच्चाटन केले जाईल. पांढरपेशा चेहरा पांघरून गुन्हेगारी करणार्‍यांची गय केली जाणार नाही. याप्रकरणी फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पो.नि. कराड यांच्या आदेशावरून बीट हेड कॉन्स्टेबल मेंडके या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. किनवट पोलिसांनी केलेल्या या सिंघम स्टाईल कारवाईचे सर्वसामान्य नागरिकांमधून जोरदार स्वागत होत आहे. मात्र, पोलिसांची नजर चुकवून काही ठिकाणी अजूनही मटका, जुगार आणि दारूचे अड्डे सुरू असण्याची शक्यता नाकारता येत नाही. रामनगर भागातील काही बहुचर्चित आणि संशयास्पद व्यक्तींवर पोलिसांनी आता विशेष लक्ष ठेवावे, अशी मागणी काही सजग सामाजिक कार्यकर्त्यांनी उघडपणे केली आहे. आता पोलीस पुढील कारवाईत कोणाचा गेम उलटवणार, याकडे संपूर्ण किनवट तालुक्याचे लक्ष लागले आहे!

COMMENTS