Homeताज्या बातम्यादेश

तामिळनाडूत शाळांजवळील 717 मद्यविक्री केंद्र बंदमुख्यमंत्री विजय यांचा आदेश ; नागरिकांकडून स्वागत

चेन्नई : तामिळनाडूमध्ये नव्या सरकारच्या स्थापनेनंतर मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी प्रशासनाला अधिक जबाबदारीने काम करण्याचे निर्देश देत मद्यविक्

तामिळनाडूमध्ये ‘थलापती’ विजय यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन होणार
तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळाविजय यांना काँगे्रसनंतर सीपीआयचा पाठिंबा
तामिळ अस्मितेचे बहुमत !


चेन्नई : तामिळनाडूमध्ये नव्या सरकारच्या स्थापनेनंतर मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी प्रशासनाला अधिक जबाबदारीने काम करण्याचे निर्देश देत मद्यविक्री केंद्रांवर कठोर कारवाई सुरू केली आहे. राज्यातील धार्मिक स्थळे, शाळा, महाविद्यालये आणि बसस्थानकांच्या परिसरात सुरू असलेली 717 मद्यविक्री केंद्रे बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला आहे. ही सर्व दुकाने संवेदनशील ठिकाणांच्या पाचशे मीटरच्या परिसरात असल्याचे विशेष पाहणीत स्पष्ट झाले आहे. संबंधित दुकाने पुढील दोन आठवड्यांत बंद करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार, तामिळनाडू राज्य विपणन महामंडळामार्फत सध्या संपूर्ण राज्यात 4 हजार 765 मद्यविक्री केंद्रे चालवली जात आहेत. मात्र अनेक ठिकाणी धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याच्या तसेच विद्यार्थ्यांवर विपरीत परिणाम होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने केल्या जात होत्या. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्रीांनी तातडीने विशेष सर्वेक्षण मोहीम राबवण्याचे आदेश दिले. या मोहिमेदरम्यान प्रशासनाने राज्यभरातील विविध भागांची तपासणी केली. तपासात 276 मद्यविक्री केंद्रे धार्मिक स्थळांच्या जवळ असल्याचे आढळून आले. मंदिर, मशिदी, चर्च आणि इतर श्रद्धास्थानांच्या परिसरात मद्यविक्री होत असल्यामुळे स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. याशिवाय 186 दुकाने शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात सुरू असल्याचेही स्पष्ट झाले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही बाब गंभीर मानण्यात आली.
तपासात आणखी 255 मद्यविक्री केंद्रे बसस्थानकांच्या जवळ असल्याचेही समोर आले. सार्वजनिक वाहतूक केंद्रांवर मोठ्या प्रमाणात महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांची वर्दळ असते. अशा ठिकाणी मद्यविक्री सुरू असल्यामुळे अनेकदा गैरप्रकार आणि अनुशासनभंगाच्या घटना घडत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे दाखल झाल्या होत्या. त्यामुळे सरकारने या केंद्रांवर कठोर भूमिका घेतली आहे. अधिकार्‍यांनी सांगितले की, सरकारचा उद्देश केवळ दुकाने बंद करणे नसून सार्वजनिक ठिकाणांच्या परिसरात सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरण निर्माण करणे हा आहे. धार्मिक आणि शैक्षणिक परिसरातील सामाजिक वातावरण बिघडू नये, यासाठी या निर्णयाची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जाणार आहे.सरकारच्या या निर्णयाचे अनेक सामाजिक संघटनांनी स्वागत केले आहे. विद्यार्थ्यांचे पालक, महिला संघटना आणि स्थानिक नागरिकांनी हा निर्णय उशिरा का होईना पण योग्य दिशेने टाकलेले पाऊल असल्याचे म्हटले आहे.
सरकारला आर्थिक फटका बसणार
राज्यातील काही व्यापार्‍यांनी या निर्णयामुळे आर्थिक फटका बसणार असल्याची चिंता व्यक्त केली आहे. मात्र प्रशासनाने सार्वजनिक हिताला प्राधान्य देत निर्णय कायम ठेवण्याचे संकेत दिले आहेत. तामिळनाडूमध्ये मद्यविक्री नियंत्रणाचा मुद्दा नेहमीच चर्चेत राहिला आहे. यापूर्वीही विविध सामाजिक संघटनांनी मद्यविक्री केंद्रांवर निर्बंध आणण्याची मागणी केली होती. आता नव्या सरकारने थेट कारवाईचा मार्ग स्वीकारत मोठ्या प्रमाणावर दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतल्याने राज्याच्या सामाजिक आणि प्रशासकीय धोरणात बदल दिसून येत आहे.

COMMENTS