परळी वैजनाथ: प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त परळी येथील श्री बजरंगबली वेताळ मंदिर येथे बुधवार, दि. २९ जुलै २०२६ रोजी विविध धार्मि

परळी वैजनाथ: प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त परळी येथील श्री बजरंगबली वेताळ मंदिर येथे बुधवार, दि. २९ जुलै २०२६ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
गुरूपौर्णिमेनिमित्त श्री बजरंगबली वेताळ मंदिरात भाविकांच्या उपस्थितीत गुरुपूजन, सामूहिक प्रार्थना, महाआरती आणि महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडणार आहे. उत्सवानिमित्त दुपारी १२ ते १ या वेळेत महाआरती होणार असून, त्यानंतर दुपारी १ ते ५ या वेळेत महाप्रसाद वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हा सोहळा प. पू. विलासानंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून, मंदिराचे अध्यक्ष श्री. यू. के. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सर्व व्यवस्था करण्यात येत आहे. तरी सर्व भाविक-भक्तांनी श्री बजरंगबली वेताळ मंदिर येथे गुरूपौर्णिमा कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

COMMENTS