Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जैवविविधता दिनानिमित्त क्रीडा संकुल पारनेर येथे वृक्षारोपण

भाळवणी /प्रतिनिधी :  मोठ्या प्रमाणात होणार्‍या औद्योगीकीकरणामुळे हवामानात बदल होत असून त्याचा परिणाम म्हणजे तापमानवाढ होत आहे. तापमान वाढीचा परिण

देशाला महात्मा गांधी,विनोबा भावे व निर्मला देशपांडे यांचे कार्य व विचार मार्गदर्शक आहेत-डॉ. कैलास दौंड
दरडगाव थडी मायराणीतील भाजप कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश
नगर शहराच्या आमदारांचं नीच राजकारण…. फलक लावत निषेध

भाळवणी /प्रतिनिधी :  मोठ्या प्रमाणात होणार्‍या औद्योगीकीकरणामुळे हवामानात बदल होत असून त्याचा परिणाम म्हणजे तापमानवाढ होत आहे. तापमान वाढीचा परिणाम पृथ्वीवरील सर्व सजीवमात्रांवर होत आहे. पारनेर येथे सृष्टीमित्र परिवाराचे अध्यक्ष लतिफ राजे यांच्या मार्गदर्शनामध्ये जागतिक जैवविविधता दिनानिमित्त क्रीडा संकुल पारनेर या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
     क्रीडा संकुल पारनेर येथे दररोज सकाळी अनेक नागरिक व्यायाम व शारिरीक तंदुरुस्तीसाठी येतात. 22 मे रोजी जागतिक जैवविविधता दिन साजरा करताना क्रीडा संकुलातील मोकळ्या जागेत वृक्षारोपण करण्याचा मानस करून सृष्टीमित्र लतिफ राजे यांनी उपस्थित नागरिकांना बरोबर घेऊन तेथे जांभूळ, आंबा, लक्ष्मीतरू, कांचन, अशोक, पांगारा, भेंडी आदींच्या 22 रोपांची लागवड केली. यावेळी उपस्थितांनी सर्व रोपे 100 टक्के जगविण्याची जबाबदारी घेतली. एप्रिल महिन्यापासून लतिफ राजे व त्यांचा मुलगा आतिफ राजे संकुलातील यापुर्वी लावलेल्या रोपांना 35 लीटर पाण्याच्या ड्रमच्या सहाय्याने पाणी देऊन या कडक उन्हाळ्यात रोपांचे संवर्धन करीत आहेत. त्यांच्या या कार्याला पाहुन सकाळी व्यायामासाठी येणारे विद्यार्थी व नागरिक त्यांच्या पर्यावरणीय कार्यात हातभार लावीत आहेत.
    यावेळी बोलताना लतिफ राजे म्हणाले तापमान वाढीचा मानवासह सर्वच सजीवांना धोका आहे. ती रोखली जावी म्हणून प्रत्येकाने वृक्षारोपण करुन त्याचे संवर्धन केले पाहिजे. तरच भविष्य काळात सजीव सुखी राहतील. आज तापमानात कमालीची वाढ झाली असून त्यामुळे अनेक संकटे निर्माण झाली असून ती टाळण्यासाठी आजच उपाय करावी लागतील. मात्र मानव या सर्व समस्यांवर अजूनही गांभीर्याने विचार करताना दिसत नाही. त्यामुळे पृथ्वीवरील पर्यावरणीज्ञ समस्या वाढत आहेत. ज्याला फक्त मानवच जबाबदार आहे असेही लतिफ राजे यावेळी बोलताना म्हणाले. लागवड केलेल्या रोपांना बिहार पॅटर्न अंतर्गत पाणी दिले जात आहे. यावेळी हर्षल टाक, सोनवणे साहेब, मोहसीन शेख, शाहिद मोमीन, प्राची एकविरे, सुमित औटी, सुजित औटी, विधाटे, ड. गणेश औटी, रशिद शेख आदी उपस्थित होते.

COMMENTS