भंडारा जिल्ह्याला राज्य सरकारची सापत्न वागणूक ; माजी आमदार चरणभाऊ वाघमारे यांचा आरोप

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भंडारा जिल्ह्याला राज्य सरकारची सापत्न वागणूक ; माजी आमदार चरणभाऊ वाघमारे यांचा आरोप

जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्येचा विचार करता, राज्य सरकारकडून अत्यावश्यक सेवा पुरविणे आवश्यक होते.

विनयभंग प्रकरणात बोठेचा नवा जामीन अर्ज ; येत्या सोमवारी होणार सुनावणी
शिवसेना नेत्यामागे चौकशीचे शुक्लकाष्ट; मंत्री अनिल परब यांची ईडीपाठोपाठ लोकायुक्त करणार चौकशी
पुण्यातून 134 किलो गांजा मुंबई, नागपूर आणि वारणसीतून 31 किलो सोने जप्त

भंडारा : जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्येचा विचार करता, राज्य सरकारकडून अत्यावश्यक सेवा पुरविणे आवश्यक होते. मात्र रुग्ण संख्या वाढत असूनही राज्य सरकार भंडारा जिल्ह्याला सापत्न वागणूक देत असल्याचा आरोप माजी आमदार चरणभाऊ वाघमारे यांनी केला आहे. 

जिल्हास्तरावरून प्रशासनामार्फत आपले अपयश लपविण्यासाठी कोव्हीड रुग्णांची आकडेवारी कमी जरी दाखविण्यात येत असली तरी प्रत्यक्षात मात्र मृतांचा आकडा मोठा आहे.   कोव्हीड रुग्णालयाबाबतचे सर्वाधिकार जिल्हाधिकारी यांना देऊन अनेक ठिकाणी तालुकास्तरावर रुग्णालय सुरू करण्यात आले परंतु अपुर्‍या ऑक्सिजन बेडच्या अभावामुळे रुग्ण भरती घेत रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. हीच परिस्थिती जिल्हा सामान्य रुग्णालयाची असून,  निव्वळ रेमडेसीविर इंजेक्शन व ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांचा जीव गेला आहे. ग्रामीण भागातील रुग्ण सामान्य रुग्णालयात गेल्यास त्यास असभ्य वागणुक देऊन परत पाठविण्यात येत असल्याचे अनेक उदाहरणे पाहायला मिळत आहे. तालुकास्तरावरील रुग्णालयात सुद्धा हीच परिस्थिती लक्षात येत आहे. त्यामुळे अनेक रुग्णास भरती घेत नसल्याने निव्वळ ऑक्सिजन व रेमडेसीविर इंजेक्शन अभावी, रुग्णवाहिकामध्ये भर रस्त्यात तर काही रुग्ण दवाखाण्यासमोरच वाहनांमध्येच, तर काहींना घरीच जीव सोडावा लागत आहे. एकीकडे राज्यातील अनेक मंत्री जिल्ह्यात येऊन बैठकावर बैठका घेऊन केंद्र राज्य शासनास आवश्यक ती सर्व मदत करुनही केंद्र शासनावर विनाकारण खापर फोडून,  राज्यशासनामार्फत जिल्ह्याला आवश्यक सर्व सोईसुविधेची मदत  करण्यात येत असल्याची खोटी माहिती देण्यात येत आहे. तर काही मंत्री या भीषण परिस्थितीत योग्य माहिती देऊन जनतेचे मनोबल उंचावण्याऐवजी मनास वाटेल तसे बोलून निर्लज्जपणाचे कळस गाठून प्रसारमाध्यमातून प्रसिद्धी मिळवून घेत आहेत. प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळीच आहे. भंडारा जिल्ह्यात शासनकर्त्यांच्या कथणीप्रमाणे आवश्यकतेनुसार 25% सुद्धा रेमडेसीविर व ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही.  दुसरीकडे विदर्भ सोडून राज्यशासनातील काही हेविवेट मंत्री आपल्या भागात एका एका रुग्णास 3-3ते 4-4 रेमडेसीविर इंजेक्शन मिळेल एवढा साठा उपलब्ध करुन देत असून ऑक्सिजन बेड सुध्दा आवश्यकतेनुसार उपलब्ध करून देत आहेत. त्यामानाने राज्य सरकार भंडारा जिल्ह्यास सापत्न वागणुक देत असुन अद्यापही जिल्ह्याला 25%सुद्धा  इंजेक्शन व कोव्हीड सेंटर मधील ऑक्सिजन बेडची व्यवस्था उपलब्ध करून दिली नसल्याने या अभावी अनेक रुग्ण जीव सोडत असल्याचा आरोप माजी आमदार चरण वाघमारे यांनी केला आहे.

COMMENTS