Homeताज्या बातम्या

माजी सैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार; आमदार प्राजक्त तनपुरे यांची ग्वाही, पिंपळगाव माळवी येथे त्रिदल माजी सैनिक सेवा संघाचे उद्घाटन

अहिल्यानगर : देशाच्या सीमेवर रात्रंदिवस कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांमुळे आपण सुरक्षित आहोत. त्यामुळे प्रत्येकाने सैनिकांप्रती कृतज्ञतेची भावना ठेव

बाबुजी आव्हाड महाविद्यालयाकडून बिजारोपण
कर्जत तालुक्यातील राशीनमध्ये वादळी वाऱ्यामुळे अनधिकृत होर्डिंग कोसळून २४ वर्षीय तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू; दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
तीस वर्षांनंतर भेटले श्री संत निळोबाराय विद्यालयाचे सवंगडी  

अहिल्यानगर : देशाच्या सीमेवर रात्रंदिवस कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांमुळे आपण सुरक्षित आहोत. त्यामुळे प्रत्येकाने सैनिकांप्रती कृतज्ञतेची भावना ठेवली पाहिजे. सेवेतून निवृत्त झाल्यानंतर माजी सैनिकांसमोरील विविध प्रश्न सोडविण्यासाठी शासनदरबारी निश्चित पाठपुरावा करू. तसेच गावपातळीवरील राजकारणातही माजी सैनिकांना योग्य स्थान व सन्मान मिळाला पाहिजे, असे प्रतिपादन आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केले.

अहिल्यानगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथे त्रिदल माजी सैनिक सेवा संघाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार अक्षय कर्डिले, माजी सैनिक संघाचे अध्यक्ष अशोक चौधरी, विनोद परदेसी, शिवाजी पालवे, त्रिदल सेवा संघाचे अध्यक्ष नारायण झिने, उपाध्यक्ष हरिराम शिंदे, सचिव विठ्ठल पारकडं, कार्याध्यक्ष पांडुरंग गुंड, अंकुश घोरपडे, गणेश आढाव, संतोष झिने, धनराज साबळे, उद्धव झिने, बापू भोसले, बबन झिने, सोमेश्वर गायकवाड, संजय म्हस्के, गोवर्धन गर्जे, सरपंच राधिका प्रभुणे, सुभाष झिने, मेहरनाथ कलचुरी, जालिंदर कदम, भाऊसाहेब रानमाळ आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार अक्षय कर्डिले म्हणाले की, देशाच्या सीमेवर कार्यरत असलेल्या सैनिकांच्या योगदानाची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. सैनिकांच्या त्यागामुळेच देशातील नागरिक सुरक्षित जीवन जगत आहेत. त्यामुळे त्यांच्या सेवेबद्दल समाजाने कायम कृतज्ञ राहिले पाहिजे. ग्रामीण भागातील ही पहिली माजी सैनिक संघटना असून, माजी सैनिकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी ती प्रभावीपणे काम करेल. दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी माजी सैनिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. त्याच परंपरेत आपणही त्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी माजी सैनिक गोवर्धन गर्जे यांनी माजी सैनिकांच्या मुलांसाठी प्रस्तावित वसतीगृहाचा अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला प्रश्न उपस्थित केला. डीपीआरमधून निधी उपलब्ध करून वस्तीगृहाचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक निधी उपलब्ध करून हे काम पूर्ण केले जाईल, असे आश्वासन देण्यात आले.

COMMENTS