Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिलाई मशिन योजनेच्या नावाखाली महिलांना गंडा  

कर्जत : स्वयंरोजगाराचे आमिष दाखवून तालुक्यातील तब्बल ४३९ बचत गटातील महिलांची ४ लाख ८२ हजार ९०० रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला

किनवटमध्ये दिव्यांग कर्मचार्‍याला नगरसेवकाची मारहाण; काम बंद आंदोलनाचा इशारा!
कर्नाटकात दहावीच्या निकालपत्रातून ‘मराठी’ गायब?सीमाभागात संताप; कर्नाटक सरकारवर टीकेची झोड
शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरवर ‘महसूल’ची कारवाईशेवगावात नाराजगी ; अवैध वाहतुकीकडे दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप
वीजपंप चोरणारे कर्जत पोलिसांकडून जेरबंद – Dainik Lokmanthan | दैनिक लोकमंथन

कर्जत : स्वयंरोजगाराचे आमिष दाखवून तालुक्यातील तब्बल ४३९ बचत गटातील महिलांची ४ लाख ८२ हजार ९०० रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिलाई मशिन योजनेच्या नावाखाली प्रत्येकीकडून ११०० रुपये उकळण्यात आले, मात्र एकाही महिलेला मशिन मिळाले नाही.
या प्रकरणी पंचायत समितीच्या सी.आर.पी. सरोज सुभाष सुतार (रा. राशीन) यांनी थेट कर्जत पोलीस ठाण्यात धाव घेत लेखी तक्रार दाखल केली आहे.
सरोज सुतार या २०१९ पासून सी.आर.पी. म्हणून बचत गटांना विविध शासकीय योजनांची माहिती देतात. याच विश्वासाचा गैरफायदा घेत प्रशांत अडसूळ (रा. कोरेगाव) याने त्यांच्याशी संपर्क साधला.
“७५०० रुपयांत दोन शिलाई मशिन देतो. सध्या फक्त ११०० रुपये बुकिंगसाठी भरा,” असे सांगून त्याने विश्वास संपादन केला. यानंतर सुतार व इतर महिलांनी तालुक्यातील ४३९ गरजू महिलांकडून पैसे गोळा करून एकूण ४ लाख ८२ हजार ९०० रुपये अडसूळकडे सुपूर्द केले. पैसे भरून अनेक महिने उलटूनही एकाही महिलेला शिलाई मशिन मिळाले नाही. पैसे परत मागितल्यावर आरोपीकडून टाळाटाळ केली जात असून फोनही उचलला जात नाही. फसवणूक झाल्याची खात्री पटताच सरोज सुतार कर्जत पोलिसांत तक्रार अर्ज दिला आहे.


“गरीब महिलांच्या तोंडचा घास पळवला”
बचत गटातील महिला अत्यंत कष्टाने पैसे साठवतात. शिलाई मशिनमुळे उत्पन्न मिळेल या आशेवर अनेक महिलांनी उसने-पासने करून ११०० रुपये भरले होते. “शासकीय योजनेचा बुरखा पांघरून गरीब महिलांची फसवणूक करण्यात आली. हा सरळ विश्वासघात आहे. आरोपीला तात्काळ अटक करून पैसे परत मिळवून द्यावेत,” अशी तीव्र मागणी महिलांनी केली आहे.

कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा
या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करावी, तसेच महिलांचे पैसे परत मिळवून द्यावेत, अशी जोरदार मागणी होत आहे. तपासात दिरंगाई झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बचत गटांनी दिला आहे.

COMMENTS