Homeताज्या बातम्या

कर्जमाफीचे 5 हजार 29 कोटी खात्यात जमाराज्यातील 6 लाख 22 हजार शेतकर्‍यांना दिलासा

मुंबई :राज्य सरकारच्या ‘पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने’ अंतर्गत पहिल्या टप्प्यातील कर्जमाफीची रक्कम शेतकर्‍यांच्या कर्जखात्य

यंदा पाऊस चांगला झाल्याने तुर पिकं डोलु लागल्याने शेतकरी समाधानी 
कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या अडचणी मार्गी लागणार; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
शेतकरी बापाला न्याय देण्यासाठी शेतकऱ्यांच्या मुलांचे २७ सप्टेंबरला आंदोलन
शेतकरी कर्जमाफी: ६.२२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०२८ कोटी जमा | Karj Mafi  Yojana


मुंबई :राज्य सरकारच्या ‘पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने’ अंतर्गत पहिल्या टप्प्यातील कर्जमाफीची रक्कम शेतकर्‍यांच्या कर्जखात्यांमध्ये जमा करण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देताना सांगितले की, आषाढी एकादशीच्या दिवशी जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीतील 6 लाख 22 हजार शेतकर्‍यांच्या कर्जखात्यांमध्ये सुमारे 5 हजार 29 कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. ज्यांनी आधार क्रमांकाची पडताळणी पूर्ण केली आहे, त्यांच्या कर्जाची नोंद पूर्णपणे निकाली निघाली असून संबंधित कर्जखाती शून्य शिल्लकीवर आली आहेत.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी स्वतंत्र अर्ज करण्याची आवश्यकता नाही. शासनाने ग्रामपंचायतींकडे पाठविलेल्या पात्र लाभार्थ्यांच्या यादीच्या आधारे प्रक्रिया सुरू आहे. संबंधित शेतकर्‍यांनी केवळ आपल्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून त्याची पडताळणी पूर्ण करायची आहे. पडताळणी पूर्ण होताच शासनाकडून मंजूर झालेली रक्कम थेट कर्जखात्यात जमा केली जात आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, काही बँकांनी थकीत कर्जावर आकारलेल्या अतिरिक्त व्याजामुळे अनेक शेतकर्‍यांच्या कर्जाची रक्कम प्रत्यक्ष देयकापेक्षा अधिक दिसत होती. शासनाने याबाबत निर्देश दिल्यानंतर संबंधित बँकांनी हे अतिरिक्त व्याज रद्द केले आहे. त्यामुळे शासनाने जमा केलेली रक्कम आणि प्रत्यक्ष कर्जरक्कम समान झाल्याने लाभार्थी शेतकर्‍यांची कर्जखाती पूर्णपणे निकाली निघाली आहेत. सध्या राज्यभरातील 18 ते 19 लाख कर्जखात्यांची पडताळणी सुरू असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. त्यापैकी सुमारे 12 लाख खात्यांमध्ये नावांतील विसंगती, तांत्रिक अडचणी किंवा दुबार नोंदी आढळून आल्या आहेत. ही प्रकरणे दुरुस्तीसाठी संबंधित बँकांकडे पाठविण्यात आली असून, एका आठवड्यात आवश्यक सुधारणा पूर्ण करण्याचे आश्‍वासन बँकांनी दिल्याचे त्यांनी सांगितले. दुरुस्तीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि आधार पडताळणी होताच उर्वरित पात्र शेतकर्‍यांच्या कर्जखात्यांमध्येही टप्प्याटप्प्याने रक्कम जमा केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पतनोंदीवर परिणाम होणार नाही
या योजनेत कोणत्याही प्रकारची एकरकमी तडजोड योजना लागू करण्यात आलेली नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे कर्जमाफीचा लाभ घेणार्‍या शेतकर्‍यांच्या पतनोंदीवर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही. भविष्यात कर्ज मिळविताना त्यांना कोणत्याही अतिरिक्त अटींचा सामना करावा लागणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
नाशिकच्या रस्त्यांबाबत केली नाराजी व्यक्त
नाशिकमधील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, शहरातील गॅस वाहिनी टाकण्याच्या कामांमुळे अनेक रस्त्यांची अवस्था खराब झाली आहे. अपेक्षित प्रमाणात घरगुती जोडण्या न दिल्याने पुन्हा पुन्हा रस्ते खोदावे लागत आहेत. याबाबत संबंधित अधिकार्‍यांची बैठक घेऊन त्यांना कामाचा सुधारित आराखडा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्‍वभूमीवर रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी आवश्यक डांबराचा पुरेसा साठा उपलब्ध राहावा म्हणून केंद्र शासनाच्या संबंधित कंपन्यांशीही संपर्क साधण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
देशविघातक साहित्यावर कठोर कारवाई
देशविघातक आणि दहशतवादी कृत्यांना प्रोत्साहन देणार्‍या साहित्यावर कठोर कारवाई करण्याबाबतही मुख्यमंत्री बोलले. समाजविघातक कृत्यांची माहिती देणारे साहित्य प्रसारित करणार्‍यांविरुद्ध नव्या कायदेशीर तरतुदींनुसार कठोर पावले उचलली जातील, असा इशारा त्यांनी दिला. राज्याच्या सुरक्षिततेला बाधा आणणार्‍या कोणत्याही प्रकारच्या साहित्याचे वितरण किंवा प्रसारण सहन केले जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

COMMENTS