Homeताज्या बातम्या

उखंडा cबीडमधील 45 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

पाटोदा : मुळचे लिंबागणेश (ता. बीड) येथील रहिवासी व सध्या बीड शहरात स्थायिक असलेले राजेश वामन निर्मळ (वय 45) यांचा उखंडा तलावात बुडून दुर्दैवी मृत

जगप्रसिद्ध रांजणखळग्यांचा रस्ताच खाचखळग्यात
देशात पेपरफुटीविरोधात कठोर कायदा लागू; राष्ट्रपतींची मंजुरी, सार्वजनिक परीक्षांतील गैरप्रकारांवर कठोर शिक्षेची तरतूद
NEET ‘फेरपरीक्षेचा’ही पेपर फुटला? आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप; निष्पक्ष चौकशीची मागणी
नांदुरा येथील तरुणाचा नर्मदा नदीत बुडून मृत्यू; ओंकारेश्वर येथे दर्शनासाठी  गेला होता तरूण | Navarashtra

पाटोदा : मुळचे लिंबागणेश (ता. बीड) येथील रहिवासी व सध्या बीड शहरात स्थायिक असलेले राजेश वामन निर्मळ (वय 45) यांचा उखंडा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवार, दि. 8 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली.

राजेश निर्मळ हे पत्नी, मेहुणी आणि तीन मुलांसह उखंडा तलाव परिसरात पर्यटनासाठी आले होते. यावेळी त्यांची मुले तलावाच्या पाण्यात उतरली होती. अचानक मुलांकडून आरडाओरड झाल्याने मुले बुडत असल्याचे लक्षात येताच त्यांना वाचवण्यासाठी राजेश निर्मळ यांनी पाण्यात उडी घेतली. मात्र तलावातील पाण्याची खोली आणि खोल खड्ड्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले.

दरम्यान, उपस्थित नागरिकांनी प्रयत्न करून मुलांना सुखरूप बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासन आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर तलावात शोधमोहीम राबविण्यात आली. अथक प्रयत्नांनंतर राजेश वामन निर्मळ यांचा मृतदेह शोधण्यात यश आले. या घटनेमुळे निर्मळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून उखंडा तलाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

COMMENTS