Homeताज्या बातम्या

आष्टी पंचायत समितीचे माजी उपसभापती आत्माराम फुंदे यांच्या मातोश्रींचे निधन

आष्टी : आष्टी पंचायत समितीचे माजी उपसभापती आत्माराम फुंदे तसेच जिल्हा परिषद सदस्य शांतीनाथ फुंदे यांच्या मातोश्री कै. पार्वती केशवराव फुंदे (आक्क

सारनाथचा ‘जागतिक वारसा’ यादीत समावेश! भारतातील युनेस्को मान्यताप्राप्त स्थळांची संख्या ४५ वर
सैनिकी विद्यालयात कारगिल विजय दिन उत्साहात साजरा; शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली
सोशल मीडियावरच्या ट्रोल धाडींना आवरा: राज ठाकरे; दुसऱ्यांनाही आया असतात, आधी आपल्या पक्षातील टोळीला आवरा!
निधन वार्ता आष्टी पंचायत समितीचे माजी उपसभापती आत्माराम केशवराव फुंदे व  शांतीनाथ केशवराव फुंदे (सर)यांच्या आई कै.पार्वती केशवराव फुंदे ...

आष्टी : आष्टी पंचायत समितीचे माजी उपसभापती आत्माराम फुंदे तसेच जिल्हा परिषद सदस्य शांतीनाथ फुंदे यांच्या मातोश्री कै. पार्वती केशवराव फुंदे (आक्का) (वय 78) यांचे आज दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने फुंदे कुटुंबीय, नातेवाईक, आप्तेष्ट व परिचितांमध्ये शोककळा पसरली आहे.

कै. पार्वती फुंदे या प्रेमळ, मनमिळाऊ व कुटुंबवत्सल स्वभावाच्या होत्या. कुटुंबाच्या जडणघडणीत त्यांनी मोलाचे योगदान देत मुलांना संस्कारांची शिदोरी दिली. त्यांच्या निधनाने फुंदे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

कै. पार्वती फुंदे यांच्या पार्थिवावर रविवार, दि. 9 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता आष्टी-शेकापूर रोडवरील ताईबाई माळा परिसरातील शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या दुःखद प्रसंगी नागरिकांनी अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन जगदंबा तरुण मंडळ, सायकड गल्ली, आष्टी यांच्या वतीने करण्यात आले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि फुंदे परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच भावपूर्ण श्रद्धांजली.

COMMENTS