Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिक्षकांच्या बदल्यांना यंदा ‘ब्रेक’! जनगणनेच्या कामामुळे राज्य सरकारचा मोठा निर्णय

https://www.youtube.com/watch?v=4xlgrDykKbE राज्याच्या शिक्षण क्षेत्रातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येतेय. आगामी जनगणनेच्या पार्श्वभ

बीडमध्ये पोलिस कर्मचार्‍याची आत्महत्या
बीडमध्ये पोलिस कर्मचार्‍याची आत्महत्या
बारामतीत पुन्हा विमान घसरले, जीवितहानी नाही

राज्याच्या शिक्षण क्षेत्रातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येतेय. आगामी जनगणनेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांना यंदा स्थगिती दिली आहे.
केंद्र सरकारने २०२७ च्या जनगणनेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. महाराष्ट्रात १६ मे ते १४ जून २०२६ या काळात जनगणनेचा पहिला टप्पा पार पडणार आहे. या महाकाय मोहिमेसाठी तब्बल २ लाख ६४ हजार प्रगणक आणि पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जनगणनेचे काम विनाअडथळा पार पडावे आणि पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध राहावे, या उद्देशाने ग्रामविकास विभागाने यंदा जिल्हा परिषद शिक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या न करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामविकास विभागाच्या उपसचिव वैशाली डिगे यांनी सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
यंदाची जनगणना डिजिटल पद्धतीने होणार असून, कर्मचारी घराघरांत जाऊन माहिती संकलित करणार आहेत. त्यामुळे क आणि ड वर्गातील कर्मचारी आणि शिक्षकांच्या बदल्या यंदा थांबवण्यात आल्या आहेत. यामुळे बदल्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांसाठी हा निर्णय धक्कादायक ठरला असला, तरी राष्ट्रीय कामासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

COMMENTS