Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दहावीचा निकाल जाहीर; मुलींनीच मारली बाजी ९२.०९ टक्क्यांसह राज्याचा निकाल लागला; कोकण विभाग टॉपवर

https://www.youtube.com/watch?v=jBaKLApjtuc दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे! महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक

दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी बीड येथे प्रवेश पूर्व मार्गदर्शन केंद्र सुरू
11 वी ऑनलाईन प्रवेशाचा श्रीगणेशा; 30 एप्रिलपर्यंत मुदत; नांदेड जिल्ह्यात तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन : माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर यांचे आवाहन
आदित्य कृषी महाविद्यालयात 257 विद्यार्थ्यांना निरोप; संस्कारांची शिदोरी घेऊन भावी अधिकारी नव्या क्षितिजाकडे

दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे! महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल जाहीर केला असून यंदाही निकालावर मुलींनीच आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. यंदा राज्याचा एकूण निकाल ९२.०९ टक्के लागला आहे. राज्यातून १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी १४ लाख ५२ हजार २४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाच्या निकालातही मुलींनी मुलांच्या तुलनेत मोठी आघाडी घेतली असून मुलींचा निकाल मुलांपेक्षा ५.४० टक्क्यांनी अधिक लागला आहे.
विभागीय निकालाचा विचार केला तर, परंपरेप्रमाणे यंदाही कोकण विभाग ९७.६२ टक्क्यांसह राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. तर सर्वात कमी निकाल छत्रपती संभाजीनगर विभागाचा (८८.४१ टक्के) लागला आहे. विशेष म्हणजे राज्यातील तब्बल ६ हजार ६१२ शाळांनी १०० टक्के निकालाची परंपरा राखली आहे. गुणवत्तेचा विचार केल्यास, ४ लाख २२ हजार ८९१ विद्यार्थ्यांनी ‘डिस्टिंक्शन’ मिळवले आहे, तर ४ लाख ८२ हजार २६४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत (९४.१० टक्के) यंदा निकालाची टक्केवारी थोडी घटली असली, तरी विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि ज्यांना अपयश आले आहे त्यांनी निराश न होता पुन्हा जोमाने तयारी करावी. निकालाची सविस्तर माहिती बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे.

COMMENTS