अशोक चव्हाणांसह 12 आमदार कॉंग्रेसचा  ‘हात’ सोडणार ?

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अशोक चव्हाणांसह 12 आमदार कॉंग्रेसचा ‘हात’ सोडणार ?

मुंबई/प्रतिनिधी : गेल्या अनेक दिवसांपासून काँगे्रस नेते अशोक चव्हाण नाराज असून, ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र चव्हाण

जाहीर सभेत अशोक चव्हाणांची तुफान डायलॉगबाजी
अशोक चव्हाण-अजित पवारांमध्ये ’गुफ्तगू’
अशोक चव्हाण होणार काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष ?

मुंबई/प्रतिनिधी : गेल्या अनेक दिवसांपासून काँगे्रस नेते अशोक चव्हाण नाराज असून, ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र चव्हाण यांनी हे वृत्त फेटाळून लावत आपण काँगे्रसमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एका प्रवक्त्याच्या घरी गुप्त भेट घेऊन भाजपमध्ये प्रवेश करण्या संदर्भातील चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे.
अशोक चव्हाण यांच्यासोबत 12 आमदार बाहेर पडणार असून, ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी वेग धरल्यामुळे काँग्रेसला मोठे खिंडार पडणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बंददाराआड चर्चाही झाल्याचं सांगितलं जातं. अशोक चव्हाण हे काँग्रेसमधून बाहेर पडणार असल्याची आधीही चर्चा होती. त्यानंतर आता हे दोन्ही नेते एकमेकांना भेटल्याने या चर्चांना अधिक उधाण आले आहे. अशोक चव्हाण हे भाजपचे प्रवक्ते आशिष कुलकर्णी यांच्या घरी गणपती दर्शनासाठी गेले होते. तिथेच काल सायंकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही आले होते. दोन्ही नेते एकाचवेळी कुलकर्णी यांच्या घरी पोहोचल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. यावेळी चव्हाण आणि फडणवीस यांच्यात बंददाराआड राजकीय चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली हे गुलदस्त्यात आहे. परंतु, दोन्ही नेते एकमेकांना भेटल्याने चव्हाण काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चांना अधिकच उधाण आले आहे. या आधीही अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र, अशोक चव्हाण यांनी ही चर्चा फेटाळून लावली होती. आपण काँग्रेस सोडणार नसल्याचे चव्हाण यांनी म्हटले होते. तर चव्हाण भाजपमध्ये येण्याच्या चर्चांवर भाजपने सोयीस्कर मौन बाळगले होते. त्यामुळे चव्हाण हे काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या चर्चांना अधिकच उधाण आले होते. काँग्रेसमधील गोंधळ आणि महाविकास आघाडी सरकारला सत्तेतून जावे लागल्यानंतर भाजप नेते प्रताप पाटील चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये येण्याचे आवतन दिले होते. त्यावरही अनेक तर्कवितर्क लढवले गेले होते. दरम्यान, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण हे मागील काही दिवसांपासून पक्षावर नाराज असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर राज्यात नव्या सरकारच्या बहुमत चाचणीसाठी आणि विधानसभेच्या अध्यक्षांच्या निवडीवेळी ते गैरहजर होते. त्यांच्यासोबत काँग्रेसचे काही आमदारांचा गटही गैरहजर असल्याने त्यांच्यातील नाराजी उघड झाली होती. त्यांनतर आता भाजपकडून काँग्रेसच्या आमदारांना फोडण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्याच पार्श्‍वभूमीवर अशोक चव्हाणांनी फडणवीसांची भेट घेतली आहे. नव्या सरकारचा पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून दुसर्‍या टप्प्यातील विस्तार रखडला आहे. पावसाळी अधिवेशन झाल्यानंतर दुसर्‍या टप्प्यातील विस्तार होणार असल्याचं सांगण्यात येत होतं. त्यानंतर आता भाजपकडून काँग्रेसच्या आमदारांचा मोठा गट फोडण्यात येणार असून त्यातील दोन आमदारांना मंत्रिपद देणार असल्याच्या चर्चा आहेत. काँग्रेसच्या आमदारांना फोडल्यानंतर दुसर्‍या टप्प्यातील मंत्रिमंळाचा विस्तार होणार असल्याच्या चर्चा आहेत.

भाजपला मदत करणारे ते अदृश्य हात कोणते ?
राज्यात काही महिन्यापूर्वी झालेल्या विधानपरिषद, राज्यसभा आणि त्यानंतर शिंदे सरकारच्या बहुमत चाचणीवेळी अशोक चव्हाणांसह चार ते पाच आमदार उशिराने सभागृहात पोहोचले होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी काही अदृश्य हात आमच्या पाठी असल्याचे सूचक विधान केले होते. फडणवीसांचे हे विधान आणि चव्हाण यांचे सभागृहात उशिरा पोहोचण्याचा त्यावेळी संबंधही लावला गेला होता.

मंत्रिमंडळ विस्ताराआधी काँगे्रसचा गट फुटणार ?
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजपमध्ये इनकमिंग वाढत असून, लवकरच काँगे्रसचा एक गट भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता असून, त्याचे नेतृत्व काँगे्रस नेते अशोक चव्हाण करत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्याचबरोबर मंत्रिमंडळ विस्ताराआधीच हा गट भाजपमध्ये दाखल होणार असून, यातील दोघांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

COMMENTS