फुटीरतेच्या वाटेवर!

Homeताज्या बातम्यासंपादकीय

फुटीरतेच्या वाटेवर!

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत आणि त्यानंतर झालेल्या राष्ट्रपती निवडणुकीत मतदान करताना काॅंग्रेसची आठ मते फुटल्याचा अहवाल काॅंग्रेसचे निरीक्षक मोहन

अतिवृष्टीतून धडा घेतला नाही तर….!
पिढीचे भान ठेवा!
जहाजाला छिद्र अन् उंदरांची दाणादाण ! 

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत आणि त्यानंतर झालेल्या राष्ट्रपती निवडणुकीत मतदान करताना काॅंग्रेसची आठ मते फुटल्याचा अहवाल काॅंग्रेसचे निरीक्षक मोहन प्रकाश यांनी दिला होता. आता काॅंग्रेसचे न‌ऊ आमदार फुटीच्या रांगेत असल्याचे बोलले जात आहे. परंतु, एकूणच काॅंग्रेसची वाटचाल सध्यास्थितीला कशी राहीली, हे पाहणे अधिक महत्त्वाचे आहे.२०१९ च्या निवडणुकीत देशातील ज्या तीन तरुणांनी राजकीय वातावरण ढवळून काढले होते, त्यापैकी हार्दिक पटेल या गुजरात मधील पाटीदार समाजाच्या नेत्यांने काँग्रेस मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसमधून बाहेर पडताना, ‘काँग्रेस हा सर्वात मोठा जातीयवादी पक्ष आहे,’ असा आरोपही त्यांनी केला. काँग्रेसचे कनेक्ट पीपल आणि हार्दिक पटेल यांचा असा आरोप या दोन्ही गोष्टींचा अन्वयार्थ आपल्याला नेमकेपणाने समजून घेतला पाहिजे. सन २०१९ च्या निवडणुकीत कन्हैयाकुमार, जिग्नेश मेवाणी, हार्दिक पटेल या तीन तरुणांनी राजकीय वातावरण ढवळून काढले होते. त्यातील जिग्नेश मेवाणी हे आधीच काँग्रेसमध्ये होते तर कन्हैया कुमार यांनी नंतर काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला; परंतु काँग्रेसमध्ये असलेले हार्दिक पटेल यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस पक्ष हा देशातील सर्वात मोठा पक्ष असल्याचे आजपर्यंत देशातील सर्वच राजकीय तज्ञ आणि विश्लेषक यांनी मान्य केले आहे. काँग्रेस गेली ३५ वर्षांपेक्षा अधिक काळ पूर्ण बहुमताने सत्तेत येऊ शकलेली नाही आणि आता तर जवळपास दोन टर्म पूर्ण होत आहेत, काँग्रेस केंद्राच्या सत्तेपासून वंचित आहे. काँग्रेसला सत्तेपासून बाहेर करणारा सर्वात महत्त्वपूर्ण जर घटक कोणी असेल तर तो काँग्रेसला ज्यांनी आपले सर्वस्व मानले होते, तो एससी, एसटी, ओबीसी आणि मायनॉरिटी हा घटक आजमितीस काँग्रेस पासून फार लांब गेलेला आहे. हे घटक लांब जाण्याचे सर्वात महत्वपूर्ण कारण म्हणजे काँग्रेसचे सर्वच निर्णय हे उच्च जातवर्गाच्या हातात स्थिरावलेले आहेत. काँग्रेसचे नेतृत्व कोणाकडेही असले तरी काँग्रेस पक्षाचे सर्व निर्णय हे वरच्या जातींच्या हितसंबंधातूनच घेतले जात असल्याचे आज पर्यंत स्पष्ट झाले आहे;  त्यामुळे गेल्या सत्तर वर्षात काँग्रेसचे हे स्वरूप उघड झाल्यामुळे हळूहळू काँग्रेसला आपले सर्वस्वी मानणारे जात – घटक हे काँग्रेस पासून फटकून वागू लागले आणि काँग्रेसचा मतदार आपोआप कमी झाला! गुजरातचे नेते हार्दिक पटेल यांनी काँग्रेसवर केलेला आरोप हा काही नवा आहे, असे नाही. काँग्रेस सारख्या मोठ्या पक्षात तरुण नेतृत्वाला किती वाव असेल हा देखील एक प्रश्न आहेच, परंतु काँग्रेससारख्या पक्षाची कार्यशैली ही आता लोकाभिमुख व्हावी आणि खऱ्या अर्थानं एससी, एसटी, ओबीसी, एनटी, मायनॉरिटी या समाज घटकांसाठी उपयुक्त व्हावी या अनुषंगाने निर्णय सत्ता राबवावी लागेल! अन्यथा काॅंग्रेसचे ‘कनेक्ट पिपल्स’ मिशन यशस्वी होणार नाही.  हार्दिक पटेल सारखे नेते हे काँग्रेसमध्ये आले तेंव्हा मुळातच हार्दिक पटेल ची भूमिका ही जाहीर पणे सुरुवातीला संघ भाजपाच्या विचारांना सुसंगत वाटत होती. कारण त्यांनी गुजरातमध्ये जनआंदोलन उभारतांना पाटीदार समाजासाठी आरक्षणाची मागणी केली होती, त्यावेळी ‘आम्हाला नाही तर कुणालाच नाही,’ अशी घोषणा देऊन आपल्या आंदोलनाला प्रारंभ केला होता. अशा प्रकारची भाषा संघ – भाजपच्या विचारधारेतून येऊ शकते, असा त्यावेळी आरोप झाला होता! त्यामुळे हार्दिक पटेलकडे तेव्हाही संशयाने पाहिले जात होते. अर्थात हार्दिक पटेल यांनी आपण भाजपमध्ये न जाण्याचे स्पष्ट केले असले तरीही येणाऱ्या काळात मोठ्या राजकीय पक्षाकडे त्यांचा झुकाव राहिल, हे नाकारता येणार नाही. त्यामुळे काँग्रेसला सोडल्यानंतर ते आप किंवा भाजप या दोनच पक्षांकडे पर्याय म्हणून जाऊ शकतात, असे आता सध्या दिसते आहे. एकंदरीत हार्दिक पटेल यांच्या आरोपांमध्ये काँग्रेस विषयी यथार्थ आरोप असला तरी काँग्रेसला आता सुधारणावादी होऊन व्यापक समाज घटकासाठी आपली भूमिका स्पष्ट करावी लागेल. ती केवळ स्पष्ट करून चालणार नाही, तर, त्यासाठी त्यांना प्रत्यक्ष कृती अवलंबावी लागेल. अन्यथा, देशातील सर्वात जुना आणि मोठा पक्ष समजला जाणारा काँग्रेस पक्ष गेल्या आठ-दहा वर्षापासून रसातळाकडे जाण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे; ती थांबवणे अवघड होईल. त्यामुळे काँग्रेसने आजच आपली बूज राखायची असेल तर देशातील सर्व बहुजन समाजाला आपला बेस म्हणून त्यांचं महत्त्व पक्षीय पातळीवर वाढवायला हवं अन्यथा काँग्रेसला पुनर्वसन करणे फार कठीण होईल! काॅंग्रेसमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून असणाऱ्या नेत्यांनी काॅंग्रेसच्या वैचारिकतेला केव्हाच तिलांजली दिली आहे!

COMMENTS