श्रीगोंदा : पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे जतन आणि भविष्यातील हरित वारसा निर्माण करण्याच्या उद्देशाने श्रीगोंदा तालुक्यातील उखलगाव येथे प्रत्येक कुटुंबाला १० आंब्याची रोपे मोफत वाटप करण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. Burckhardt Compression India Pvt. Ltd. यांच्या कॉर्पोरेट सामाजिक दायित्व निधीतून आणि चिराग फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित या उपक्रमाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने रोपांचा स्वीकार केला.कार्यक्रमाचे उद्घाटन कंपनीचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजू लाकुडझोडे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रा. संजय लाकुडझोडे पाटील, सामाजिक कार्यकर्ते बाबा दरवडे, विलास पाटील लाकुडझोडे, माऊली लाकुडझोडे, निलेश धावडे, स्वप्निल चंदन आणि अनिल दरवडे यांची प्रमुख उपस्थिती होती.बाळासाहेब ढवळे यांच्या निवासस्थानी रोपांचे वितरण करण्यात आले. यापूर्वी ग्रामस्थांना लागवडीसाठी आवश्यक खड्डे तयार ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे रोपे मिळताच त्यांची त्वरित लागवड करण्यात आली. प्रत्येक रोपाचे ‘जिओग्राफिकल टॅगिंग’ करण्यात येणार असल्याने त्याच्या संगोपनावरही प्रभावीपणे लक्ष ठेवता येणार आहे.रोपांची लागवड शास्त्रोक्त पद्धतीने व्हावी, यासाठी नर्सरीतील तज्ज्ञांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. खड्ड्यांची तयारी, लागवडीची योग्य पद्धत, खतांचा वापर, पाणी व्यवस्थापन तसेच लागवडीनंतर रोपांची काळजी कशी घ्यावी, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. त्यामुळे रोपे केवळ लावली जाणार नसून त्यांचे संवर्धनही प्रभावीपणे होणार आहे.या उपक्रमासाठी सरपंच बापूसाहेब ढवळे, गणेश लाकुडझोडे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. ‘एक कुटुंब – दहा झाडे – हिरवेगार, समृद्ध उखलगाव’ या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या अभियानामुळे पर्यावरण संवर्धनाला चालना मिळणार असून भविष्यात गाव अधिक हिरवेगार होण्याबरोबरच आंब्याच्या झाडांमधून ग्रामस्थांना आर्थिक लाभही मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

COMMENTS