Homeताज्या बातम्या

श्रीरामपुरातील ज्ञानराधा मल्टिस्टेट फसवणूक प्रकरणात चेअरमन सुरेश कुटेसह १० संचालकांना अटक; १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी

श्रीरामपूर : बीड येथील ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या फसवणूक प्रकरणात अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल अ

अवैध वाळू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १८ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त
मोहा हद्दीतील अवैध कलाकेंद्र बंद करा; अन्यथा अमरण उपोषण करणार: सचिन आजबे यांचा इशारा
अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी कारवाई; ‘गर्भलिंग निदान’ प्रकरणी आणखी दोघांना अटक, आरोपींची संख्या २१ वर, ७ डॉक्टरांचा समावेश
ज्ञानराधा मल्टिस्टेटचे अध्यक्ष सुरेश कुटेंविरोधात गुन्हा दाखल करण्याचे  न्यायालयाचे निर्देश Beed Marathi News | Court's direction to file a case  against Gyanaradha ...

श्रीरामपूर : बीड येथील ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या फसवणूक प्रकरणात अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात चेअरमन सुरेश कुटे यांच्यासह १० जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना बुधवारी (१० जून) श्रीरामपूर न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने १६ जूनपर्यंत ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

अटक करण्यात आलेल्यांची नावे: चेअरमन सुरेश ज्ञानोबा कुटे (वय ४८, रा. कुटेवाडी, बीड), संचालक यशवंत वसंतराव कुलकर्णी (वय ५५, रा. कवडगाव, बीड), वसंतराव शंकरराव सटाले (वय ५३, रा. पिंपळगाव, माजलगाव), वैभव यशवंत कुलकर्णी (वय २६, रा. कवडगाव), कैलास काशिनाथ मोहिते (वय ३६, रा. जिरेवाडी, बीड), रवींद्र मधुकर तलबे (वय ४०, रा. बीड), आशिष पद्माकर पाटोडेकर (वय ३३, रा. पाटोदा, धाराशिव), रघुनाथ सखाराम खरसाडे (वय ४०, रा. जिरेवाडी), रवींद्र श्रीरंग यादव (वय ५२, रा. बीड), आणि दादाराव हरीदास उंदरे (वय ५५, रा. छत्रपती संभाजीनगर).

ज्ञानराधा मल्टिस्टेटने आकर्षक व्याजदराचे आमिष दाखवून ठेवीदारांकडून मोठ्या प्रमाणात ठेवी स्वीकारल्या होत्या. मात्र, मुदत संपल्यानंतरही पैसे परत न मिळाल्याने या संस्थेवर बीडसह विविध जिल्ह्यांत एकूण ९८ गुन्हे दाखल आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात श्रीरामपूर शहर व जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद असून, आर्थिक गुन्हे शाखेकडून (EOW) याचा तपास सुरू आहे.

श्रीरामपूर येथील गुन्ह्याचे ‘फॉरेन्सिक ऑडिट’ पूर्ण झाले असून यामध्ये तब्बल ४७ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आतापर्यंत ३१४ गुंतवणूकदारांचे जबाब नोंदवले आहेत. बीड जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या या सर्व आरोपींना अहिल्यानगर आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी श्रीरामपूरच्या गुन्ह्यात वर्ग करून घेत ही कारवाई केली.

COMMENTS