देवळाली प्रवरा : राहुरी शहरात येत्या रविवारी (दिनांक १४ जून २०२६) अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने आयोजित पावन पालखी-पाद

देवळाली प्रवरा : राहुरी शहरात येत्या रविवारी (दिनांक १४ जून २०२६) अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने आयोजित पावन पालखी-पादुका परिक्रमेचे आगमन होत आहे. या पालखी यात्रेचे हे २९ वे वर्ष असून, यानिमित्ताने संपूर्ण शहरात भक्तीमय आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले आहे. ज्या भाविकांना अक्कलकोटपर्यंत जाणे शक्य होत नाही, त्यांच्यासाठी ही पालखी म्हणजे प्रत्यक्ष स्वामींच्या दर्शनाचा सुवर्णयोग मानला जात आहे.
रविवारी १४ जून रोजी दुपारी ठीक ५ वाजता राहुरीतील शनी मारुती मंदिरात पालखीचे आगमन होईल. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता भाविकांच्या उपस्थितीत भव्य मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे. ही मिरवणूक राहुरी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती, नगर-मनमाड रोड, डॉ. जयंत कुलकर्णी हॉस्पिटल, शुक्लेश्वर मंदिर, शिवाजी चौक आणि नगरपालिका या मार्गे मार्गक्रमण करत पुन्हा शनी मारुती मंदिरात येईल.
मिरवणुकीनंतर रात्री ९:३० वाजता महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, अक्कलकोट येथे अन्नछत्र मंडळाच्या वतीने भव्य ५ मजली महाप्रसादगृह, यात्रीनिवास व गणेश मंदिर उभारणीचे काम वेगाने सुरू असल्याची माहिती आयोजकांनी दिली. राहुरी शहर व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या सोहळ्याचा आणि दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ, राहुरी शहर व तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS