Homeताज्या बातम्या

विविध मागण्यांसाठी भालावणीमध्ये उपोषण  

भाळवणी : ग्रामपंचायतीकडे विविध मागण्यांबाबत आठ दिवसांपूर्वी लेखी निवेदन दिल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते शिवाजी सुदाम पट्टेकर यांनी शनिवारी (दि. २०)

स्वच्छता,आरोग्य आणि शिक्षणासाठी रोटरी कटिबद्ध : बोराशेवगाव बसस्थानकातील पाणपोईचे नूतनीकरण; २५ डस्टबिनचे लोकार्पण
गौरी शुगरचे मिल रोलर पूजन उत्साहात
महसूल अभियानात प्रमाणपत्र वाटपाचा केवळ दिखावा?लाभच मिळेना; दिव्यांग-निराधारांवर उंबरठे झिजवण्याची वेळ; राहाता तहसीलच्या कारभारावर प्रश्नचिन्ह


भाळवणी : ग्रामपंचायतीकडे विविध मागण्यांबाबत आठ दिवसांपूर्वी लेखी निवेदन दिल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते शिवाजी सुदाम पट्टेकर यांनी शनिवारी (दि. २०) भाळवणी येथील बाजारतळावरील ज्येष्ठ नागरिक विचार मंचाच्या ओट्यावर उपोषणास प्रारंभ केला. पट्टेकर यांनी ग्रामपंचायतीकडे विविध मागण्यांबाबत कार्यवाही करण्याची मागणी केली होती. मात्र, त्यावर समाधानकारक निर्णय न झाल्याने त्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला. उपोषणस्थळी दिवसभर विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला. तसेच प्रतिक्रिया वहीत आपल्या भावना नोंदविल्या. दरम्यान, गावातील भजनी मंडळाच्या वतीने उपोषणाला पाठिंबा दर्शवित सुमारे दोन तास भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यामुळे उपोषणस्थळी धार्मिक आणि शांततापूर्ण वातावरण निर्माण झाले.

COMMENTS