Homeताज्या बातम्या

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या    

देवळाली प्रवरा : सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या कथित शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून माहेर देवळाली प्रवरा येथील २५ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन

चौथ्या दिवशीही देवळाली प्रवरा परिसर ड्रोनच्या दहशतीखाली; पोलिसांच्या निष्क्रियतेवर नागरिकांचा संताप
शेवगाव दूध भेसळ प्रकरणातील तक्रारीची मुख्यमंत्री सचिवालयाकडून दखल; अन्न सुरक्षा अधिकाऱ्याच्या चौकशीचे निर्देश
दुरगाव येथे महिलेस मारहाण


देवळाली प्रवरा : सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या कथित शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून माहेर देवळाली प्रवरा येथील २५ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील डाळिंब येथे घडली. या प्रकरणी पतीसह सहाजणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पती व दीर यांना अटक करण्यात आली आहे.
वैष्णवी अजिंक्य कांबळे (वय २५) असे मृत विवाहितेचे नाव आहे. तिची आई आशा संतोष साबळे (रा. देवळाली प्रवरा) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
 पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैष्णवी हिचा विवाह १५ जून २०२२ रोजी डाळिंब येथील अजिंक्य कांबळे याच्याशी झाला होता. विवाहानंतर काही काळ संसार सुरळीत सुरू होता. मात्र, पतीला दारूचे व्यसन लागल्यानंतर कौटुंबिक वाद वाढले. विवाहात अपेक्षेप्रमाणे वस्तू व पैसे मिळाले नसल्याचा ठपका ठेवून पतीकडून वारंवार मारहाण व मानसिक छळ केला जात असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.  
आठ जून रोजी सायंकाळी वैष्णवीने आईशी संपर्क साधून सासरी होत असलेल्या त्रासाबाबत पुन्हा व्यथा मांडली होती. त्यानंतर पती, सासू, सासरे, दीर व इतरांनी मिळून तिला मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. मारहाणीत ती बेशुद्ध पडली होती, तरी तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
 नऊ जून रोजी सकाळी आशा साबळे या मुलीला भेटण्यासाठी निघाल्या असताना जावई अजिंक्य कांबळे याने दूरध्वनी करून वैष्णवीने गळफास घेतल्याची माहिती दिली. त्यानंतर त्या तातडीने पुण्याकडे रवाना झाल्या. दरम्यान, वैष्णवीला यवत येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला असे फिर्यादीत म्हटले आहे.

COMMENTS