साकतला बायोडिझेलचा साठा जप्त

Homeअहमदनगर

साकतला बायोडिझेलचा साठा जप्त

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर तालुक्यातील साकत येथे अवैधरित्या बायोडिझेलची विक्री सुरू असताना पुरवठा विभागाने छापा टाकला. या ठिकाणी नऊ हजार लिटर बायोडिझेल,

टॉप हंड्रेड थकबाकीदारांमध्ये…नगर टॉपवर
संगमनेरमध्ये महानगर बँकेची बनावट सोने तारणप्रकरणी 83 लाखाची फसवणूक
कोपरगावचे डॉ. रामदास आव्हाड यांना राष्ट्रीय धन्वंतरी पुरस्कार प्रदान

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर तालुक्यातील साकत येथे अवैधरित्या बायोडिझेलची विक्री सुरू असताना पुरवठा विभागाने छापा टाकला. या ठिकाणी नऊ हजार लिटर बायोडिझेल, एक टँकर (एमएच 12 डीजे 6320) व एक ट्रक (एनटी 34 व्ही 7049) असा 16 लाख 82 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पुरवठा निरीक्षक वैशाली शिकारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिस ठाण्यात आरोपी शरद मोहन ठुबे (रा. केडगाव, नगर), विकास बाळासाहेब रोमन (रा. लोहसर खांडगाव, ता. पाथर्डी), दत्ता सुखदेव भालके (रा. लोंढेमळा, केडगाव), बालसुब्रमण्यम आरूमुरगन (रा. तमिळनाडू) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी किशोर कदम, पुरवठा निरीक्षक राजेंद्र राऊत, वैशाली शिकारे, अभिजित वांढेकर, महादेव कुंभार यांच्या पथकाने साकत शिवारात पंजाब नॅशनल ढाब्याशेजारी हा छापा टाकला.

COMMENTS