सहकर पॅनलचे जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सहकर पॅनलचे जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल

नगर –पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विचारांनी प्ररित होत भाजपात स्वच्छ कारभार करत आहे. त्याच धर्तीवर अर्बन बँकेच्या

सिव्हीलच्या आगीचे कारण…शासनच करणार स्पष्ट
आजपासून अहमदनगर निर्बंधमुक्त, कोरोना नियमांचे उल्लंघन मात्र भोवणार
राज्य मार्ग ६५ कोपरगाव –पढेगाव-वैजापूर रस्त्यासाठी अडीच कोटी निधी मंजूर : आ. आशुतोष काळे

नगर –पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विचारांनी प्ररित होत भाजपात स्वच्छ कारभार करत आहे. त्याच धर्तीवर अर्बन बँकेच्या निवडणुकीत उतोरलो आहे. नगर अर्बन बँक हि जिल्ह्यातील प्रमुख मोठी बँक आहे. अर्बन बँकेची मलीन झालेली प्रतिमा पुन्हा उजळविण्यासाठी व बँकेला गतवैभव प्रप्त करुन देण्यासाठी मी सहकार पॅनल मधून निवडणूक लढवत आहे. सर्वाना बरोबर घेत काम करणार आहे, असे प्रतिपादन भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी केले.

          नगर अर्बन बँक संचालक मंडळाच्या निवडणुकी साठी स्व.दिलीप गांधी प्रेरित सहकार पॅनलच्या सर्वच्या सर्व १८ उमेदवारांनी आज सकाळी ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात महाआरती केली. यावेळी माळीवाडा ते जिल्हा सहकारी बँके मधील निवडणूक कार्यालया पर्यंत ढोल ताश्यांच्या गजरात मिरवणुकीने जाऊन जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, उद्दोजक मोहन मानधना, श्रीमती सरोज गांधी, मर्चंट बँकेचे संचालक अनिल पोखरणा, माजी जी.प. अध्यक्ष विठ्ठल लंघे, सहकार महर्षी सुवालाल गुंदेचा जैन ओसवाल पतसंस्थेचे चेअरमन किरण शिंगी, शिवसेनेचे संजय शेंडगे, मर्चंट बँकेचे माजी चेअरमन महोन मानधना, नेवासा पं.स.चे सभापती भगवानराव गंगावणे, नेवासा शिवसेना तालुका प्रमुख मच्छिंद्र म्हसे आदींसह भाजपचे सर्व नगरसेवक व विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होत. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सहकार पॅनल मधून भैय्या गंधे, नेवाश्याचे उद्दोजक सचिन देसार्डा, माजी संचालक आज बोरा व गांधी परिवारा तर्फे सौ.दीप्ती सुवेन्द्र गांधी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सुवेंद्र गांधी म्हणाले, अर्बन बँकेच्या बाबतीत मागील काळात ज्या घटना घडल्या त्यावर परदा टाकण्याची हि निवडणूक आहे. सहकार पॅनलच्या सर्व १८ उमेदवारांनी आपला अर्ज दाखल केला आहे. स्व.दिलीप गांधी यांनी बँकेचे पाहिलेले स्वप्न पूर्ण करणार आहोत.

COMMENTS