आता बुलढाणा शहराला होणार नियमित पाणीपुरवठा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आता बुलढाणा शहराला होणार नियमित पाणीपुरवठा

बुलडाणा : नगरपालिका अंतर्गत शहरातील तीन मुख्य झोन च्या माध्यमातून नियमित पाणीपुरवठा करण्याचा आदेश शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी दिले आहेत ही भेट

तर रस्त्यावरची लढाई लढावी लागेल !
मराठवाड्यावर आभाळ फाटले
बारामतीचा गड उद्धवस्त करणे इतके सोपे नाही.

बुलडाणा : नगरपालिका अंतर्गत शहरातील तीन मुख्य झोन च्या माध्यमातून नियमित पाणीपुरवठा करण्याचा आदेश शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी दिले आहेत ही भेट दीपोत्सवाच्या शुभमुहूर्तावर नागरिकांना मिळणार असल्याने दीपावलीच्या आनंदात साखर पडणार असल्याने शहरात आनंदाचे वातावरण आहे धरण उशाला अन् कोरड घशाला अशी अशी अवस्था बुलढाण्यातील नागरिकांची झाली होती येळगाव धरणात मुबलक पाणी साठा असूनही नागरिकांना आठ-आठ दिवस न येण्याची वाट बघावी लागते बुलढाणा नगरपालिकेत आज पर्यंत अनेक आमदारांनी सत्ता उपभोगली आहे मात्र मागील सत्तर वर्षाच्या काळात बुलढाण्याला नियमित पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न पालिकेच्या वतीने करण्यात आला नाही किंवा कोणत्याही आमदाराने यासाठी परिश्रम घेतले नाही शिवसेनेचे संजय गायकवाड हे आमदार झाल्यानंतर त्यांनी अनेक बुलढाण्याच्या विकासाच्या अनुषंगाने मोठे निर्णय झटपट घेतले पाण्याच्या या सर्वात मोठ्या व गंभीर प्रश्नाला सोडविण्यासाठी आमदार संजय गायकवाड मागील अनेक महिन्यापासून योजना सहा परिश्रम करीत आहेत बुलढाण्याला दररोज पाणीपुरवठा करण्यात यावा यासाठी आवश्यक सर्व बाबींची तपासणी व पूर्तता करण्याचे आदेश नगरपालिकेला दिले होते त्याप्रमाणे नगरपालिकेच्या वतीने देखील अंमलबजावणी केली जात आहे शहराला नियमित पाणीपुरवठा व्हावा या उद्देशाने नियोजन देखील करण्यात आले आहे दीपावलीच्या शुभमुहूर्तावर या निर्णयावर अंमलबजावणी केली जात आहे दीपावलीच्या प्रारंभी पाच दिवस लगातार नागरिकांना पाणी मिळणार आहे व त्यानंतर एक दिवसाआड पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे नियमित पाणीपुरवठा यासाठी पालिकेच्या वतीने तीन होऊन तयार करण्यात आले आहेत पहिला जून मध्ये चैतन्य वाडी विष्णूवाडी अष्टविनायक नगर लक्ष्मी नगर सरस्वती नगर महाविर नगर जगदंबा नगर केशवनगर एकता नगर जिजामाता नगर लहाने लेआउट रामनगर सदाफुली सोसायटी राजगुरू लेआऊट छत्रपती नगर पाळणाघर आदी परिसराचा समावेश आहे या  झोन साठी 25 लाख लिटर पाण्याचा उपयोग केला जाणार आहे तर दुसऱ्या जवळ मध्ये बाजार लाईन भिमनगर एकबाल नगर मटन मार्केट स्मशानभूमी परिसर गवळीपुरा जोहर नगर जावई नगर मिर्झा नगर भंगार लाईन क्रांतीनगर सराफा नगर संभाजीनगरशिवनेरी कारंजा चौक पोलीस मुख्यालय परिसर आदी परिसराचा समावेश करण्यात आलेला आहे या जॉन साठी सुमारे 13 लाख लिटर पाण्याचे नियोजन आहे तर तिसऱ्या जून मध्ये सोळंके लेआउट गणेश नगर चंद्रमणी नगर कराळे लेआउट क्रीडा संकुल परिसर वावरे लेआऊट विदर्भ हाउसिंग सोसायटी आरास लेआउट मोठे लेआउट मच्छी लेआउट जॉन बंगला परिसर वानखेडे लेआउट भीलवाडा जुनागाव टिळकवाडी आदी परिसराचा समावेश करण्यात आलेला आहे या दोघांसाठी 11 लाख लिटर पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे काही ठिकाणी धुंदुर असल्यास शेवटपर्यंत पाणीपुरवठा होऊ शकत नसल्याने अशा परिसरातील नागरिकांसाठी पालिकेच्यावतीने आरक्षित झोन मधील पाणीपुरवठा उपलब्ध करून दिला जाणार आहेदिवाळीनिमित्त शहरामध्ये दररोज तीस मिनिटे पाणीपुरवठा केला जाणार आहे अशी माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे

COMMENTS