Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्पर्धा परीक्षेतील यशासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा करावी ः सुस्मिता विखे

शिर्डी प्रतिनिधी ः विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करताना नियमित अभ्यास करणे गरजेचे आहे. विद्यार्थी दशेपासून सामान्य ज्ञान या घटकाची तयार

पंचनामा नको नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट भरपाई द्या- शीला खेडकर
दैनिक लोकमंथन ; माध्यमांच्या वृत्ताकंनावर बंदीस नकार ;विखेंची रेमडेसिव्हिर खरेदी चंदीगडमधून
जनार्दन स्वामींवरील दीर्घकाव्याच्या मुखपृष्ठाचे अनावरण

शिर्डी प्रतिनिधी ः विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करताना नियमित अभ्यास करणे गरजेचे आहे. विद्यार्थी दशेपासून सामान्य ज्ञान या घटकाची तयारी करण्यासाठी नियमित वर्तमानपत्र वाचन करावे, तसेच आपापल्या विषयाचे देखील सखोल ज्ञान मिळवावे नेट, सेट, गेट यासारख्या परीक्षांसाठी प्रचंड स्पर्धा आहे. उत्तर येत नसेल तर चुकीचे उत्तर देण्यापेक्षा नम्रपणे उत्तर येत नाही असे सांगितले तर तुमची चांगली छाप पडेल. स्पर्धा परीक्षातील यशासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा करावी. असे उदगार लोकनेते डॉ.बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुस्मिता विखे-पाटील यांनी काढले. त्या राहाता येथील शिर्डी साई रुरल इन्स्टिट्यूटच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात रसायनशास्त्र विभाग आयोजित रसायनशास्त्र विषयातील स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन या दोन दिवशीय राष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. त्यापुढे म्हणाल्या स्पर्धा परीक्षेला न घाबरतात आत्मविश्‍वासाने सामोर जाणे गरजेचे आहे.वेळेचे नियोजन करून अभ्यासक्रमातील बारकावे ओळखावे अभ्यासक्रमातील संबंधित विषयाची माहिती घेऊन त्यानुसार सातत्यपूर्ण अभ्यास करून आत्मविश्‍वासाने परीक्षा दिली तर यश निश्‍चित मिळते. तसेच स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी महाविद्यालयाने विविध विषयांच्या कार्यशाळेचे नियमितपणे आयोजन करावे असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य प्रो.डॉ सोमनाथ घोलप म्हणाले महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र कार्यरत असून या केंद्रामार्फत महाविद्यालयातील तसेच राहाता व गणेश परिसरातील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन केले जाते. संस्थेचे अध्यक्ष नामदार श्री राधाकृष्णजी विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील व खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी येथे मोफत प्रवरा स्पर्धा परीक्षा अभ्यासिका कार्यरत असून परिसरातील विद्यार्थ्यांसाठी संदर्भ ग्रंथ, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शनाही त्यांना लाभत आहे. दोन दिवसीय कार्यशाळेत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा बद्दल सखोल माहिती व ज्ञान तसेच आत्मविश्‍वासही लाभेल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. या राष्ट्रीय कार्यशाळेत विविध महाविद्यालयातील 177 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या कार्यशाळेसाठी बँक ऑफ महाराष्ट्र- शाखा शिर्डी तसेच आत्मजा सेल्स औरंगाबाद यांनी आर्थिक सहाय्य केले. याप्रसंगी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी श्री नितीन लांडगे यांनी महाविद्यालयास 65 इंची अँड्रॉइड कलर टीव्ही भेट दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.बाबासाहेब सलालकर यांनी केले. यावेळी प्रो.डॉ.व्हि डि. बोबडे आर.वाय.के कॉलेज नासिक,आश्‍वी कॉलेजचे कॅम्पस डायरेक्टर डॉ.राम पवार,शिर्डी साई रुरल इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर डॉ.महेश खर्डे,प्राचार्य डॉ.सोमनाथ घोलप,डॉ.बाळासाहेब विखे पाटील इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य किशोर निर्मळ, उपप्राचार्य संजय लहारे, डॉ. सुरेश पुलाटे, डॉ.दादासाहेब डांगे सर्व विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक- प्राध्यापकेतर सेवक व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंग्रजी विभाग प्रमुख डॉ.रोहिणी कासार यांनी केले तर आभार रसायनशास्त्र विभाग प्रमुख व कार्यशाळेचे समन्वयक प्रा.आदिनाथ तांबे यांनी मानले.

COMMENTS