सिव्हीलच्या आगीचे कारण…शासनच करणार स्पष्ट

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सिव्हीलच्या आगीचे कारण…शासनच करणार स्पष्ट

विभागीय आयुक्त गमेंनी सादर केला अहवाल, कारणाबाबत उत्सुकता

अहमदनगर/प्रतिनिधी : नगरच्या सिव्हील रुग्णालयात भाऊबीजेच्या दिवशी लागलेल्या आगीचे कारण आता राज्यातील महाविकास आघाडीचे सरकारच स्पष्ट करणार आहे. या आगीच

शहर सहकारी बँकेचे बोगस कर्ज प्रकरण आता चर्चेत ; पुरवठादार मालपाणीला झाली अटक
वर काजूच्या गोण्या..त्याखाली दारूचे बॉक्स
गतवर्षीच्या नुकसान भरपाईसाठी शेतकर्‍यांचे बोंबाबोंब आंदोलन

अहमदनगर/प्रतिनिधी : नगरच्या सिव्हील रुग्णालयात भाऊबीजेच्या दिवशी लागलेल्या आगीचे कारण आता राज्यातील महाविकास आघाडीचे सरकारच स्पष्ट करणार आहे. या आगीच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष व नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी, हा चौैकशी अहवाल शासनाकडे पाठवलेला आहे. अहवाल दिल्यानंतर शासन स्तरावरून या अहवालातून काय काय नमूद केलेले आहे, ते शासन सांगेल असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सिव्हीलमध्ये लागलेल्या आगीचे नेमके कारण काय, याची उत्सुकता वाढली आहे.
नगर जिल्हा रुग्णालयातील आयसीयु सेंटरला सहा नोव्हेंबर रोजी आग लागली होती. या आगीमध्ये सुरुवातीला दहा जणांचा त्यानंतर चार जणांचा असा 14 जणांचा मृत्यू झालेला आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वरिष्ठांना या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नगर जिल्ह्यामध्ये येऊन जिल्हा रुग्णालयातील घडलेल्या प्रकारासंदर्भामध्ये पाहणी केली होती, त्यानंतर त्यांनी विभागीय आयुक्त नाशिक यांच्यामार्फत या घटनेची चौकशी होऊन ते राज्य शासनाला अहवाल सादर करतील, अशा प्रकारचे निर्देश दिले होते. त्यानुसार नाशिकचे विभागीय आयुक्त गमे यांच्या अधिपत्याखाली सात जणांची चौकशी समिती गठीत करण्यात आलेली होती. या समितीने अनेकांचे जबाब घेतले आहे तर दुसरीकडे काही महत्त्वाची कागदपत्रे जी तपासाच्या दृष्टिकोनातून पाहिजे होती, ती सुद्धा या समितीने तपासली असून शासनाला दिलेल्या अहवालात समवेत या कागदपत्रांची माहिती सुद्धा समितीने दिलेली आहे, पण नेमकी आग कशामुळे लागली याबाबत कारण अद्यापही गुलदस्त्यामध्ये आहे. गमे यांनी त्यावर बोलण्यास नकार दिल्याने आता राज्य शासनाकडूनच या आगीचे नेमके कारण काय होते, हे स्पष्ट होणार आहे.

COMMENTS