Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ; निवडणुकीचा मार्ग मोकळा

नवी दिल्ली : भाजपचे अमरावती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र गुरूवारी सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवले आहे. सर्वोच्च न्या

खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी
खासदार नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी
हजारो महिलांसोबत नवनीत राणां यांनी हनुमान चालीसा पठन

नवी दिल्ली : भाजपचे अमरावती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र गुरूवारी सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवले आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर निकाल देतांना नवनीत राणा यांना दिलासा देत उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला आहे. राणा यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे, त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला जात असतांना, सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे.
नवनीत राणा या 2019 मध्ये अमरावती मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढल्या होत्या. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता. मात्र, निवडून आल्यानंतर अडसूळ यांनी राणा यांच्या जातप्रमाणपत्राला आक्षेप घेतला होता. नवनीत राणा यांनी निवडणूक लढवण्यासाठी चुकीची जात दाखवली आहे. त्यांनी स्वत:ची जात मोची अशी सांगितली आहे. मात्र, त्या पंजाबी चर्मकार आहेत, असा दावा अडसूळ यांनी केला होता. अडसूळ यांच्या याचिकेवर निर्णय देताना उच्च न्यायालयानं नवनीत राणा यांचे जातप्रमाणपत्र अवैध ठरवले होते. राणा यांनी बनावट कागदपत्रांचा वापर करून मोची जातीचा दाखला मिळवल्याचे उच्च न्यायालयाने 8 जून 2021 रोजी नमूद केले होते. राणा या ’शीख-चर्मकार’ जातीच्या असल्याचे नोंदीवरून दिसते, असे सांगत न्यायालयाने त्यांना दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावला होता. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायमूर्ती जे. के. माहेश्‍वरी आणि न्यायमूर्ती संजय करोल यांच्या खंडपीठापुढे त्यांच्या आव्हान याचिकेवर सुनावणी झाली. दोन्ही न्यायमूर्तींनी एकमताने उच्च न्यायालयाचा निर्णय रद्दबातल केला. 2013 मध्ये मुंबई जिल्हाधिकार्‍यांनी नवनीत राणा यांना मोची जातीचे प्रमाणपत्र दिले होते. जातपडताळणी समितीनेही त्यास मान्यता दिली होती. उच्च न्यायालयात त्यात हस्तक्षेप करण्याची गरज नव्हती, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.

COMMENTS