Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीडच्या श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडीच्या अध्यात्मिक वैभवात भर

बीड प्रतिनिधी - बीड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे लोकसहभागातून महाराष्ट्रातील सर्वात मोठा भव्यदिव्य कीर्तन मंडप साकारतोय. 48 हजार

50 हजारांची लाच घेणारा भूमापक एसीबीच्या जाळयात
अदानींना एवढे यश मिळण्यामागे नेमके कोण ?
पावसाळ्यात नदी व खाडी किनाऱ्यावर नैसर्गिक आपत्ती परिस्थितीवर मात करण्यासाठी पोलिसांचे मॉकड्रील

बीड प्रतिनिधी – बीड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे लोकसहभागातून महाराष्ट्रातील सर्वात मोठा भव्यदिव्य कीर्तन मंडप साकारतोय. 48 हजार स्केवर फुट किर्तन मंडपात एकाच वेळीं 30 हजार भाविक या मंडपात बसून कीर्तन श्रवण करूं शकणार आहेत. या भव्य कीर्तन मंडपाची उभारली संत सद्गुरू किसन बाबा महाराज यांच्या रौप्य महोत्सवी पुण्यतिथी उत्सवा निमित्त होत आहे. 272 गावातून भाविकांची सढळ हाताने देणगी दिली आहे. शांतीब्रम्ह महंत नवनाथ बाबा महाराज यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हि वास्तू अंतिम टप्यात आहे.
विसाव्या शतकातील महान संत विभूती संत सद्गुरू किसन बाबा महाराज यांच्या 25 व्या पुण्यतिथीनिमित्त दि. 24 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या कालावधीत रोप्य महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होत आहे. पावसाळ्यात हा उत्सव होत असल्याने या उत्सवासाठी येणार्‍या भाविकांसाठी कायमस्वरुपी किर्तन मंडप असावा. यासाठी भाविकांनी लोकंसहभागातून या भव्य किर्तन मंडपाची संकल्पना साकार होत आहे. महाराष्ट्रातील सर्वात भव्य दिव्य असा कीर्तन मंडप म्हणून याची नोंद होणार आहे. शांती ब्रह्म संत नवनाथ बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्यातील 272 गावातील भाविकांनी या कीर्तन मंडपासाठी सढळ हाताने देणगी दिली आहे. विशेष सहभाग 60 गावकर्‍यांनी दिला आहे.याच किर्तन मंडपात रौप्य महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहात महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन भजन व प्रवचने होणार आहेत.

COMMENTS