रमजानमध्येही मुस्लिमांचे मोठ्या प्रमाणात रक्तदान

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रमजानमध्येही मुस्लिमांचे मोठ्या प्रमाणात रक्तदान

कोरोना संकट काळात महाराष्ट्रात जाणवणार्‍या रक्त टंचाईवर मात करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदान शिबिरे घेण्याचे आवाहन केले होते.

Navab Malik :आरक्षणाशिवाय निवडणूका घेऊ नये या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस आजही ठाम| LOKNews24
बेकायदा गाळ्याविरोधात ग्रामस्थाचा पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न
रोनाल्डोला मिळाला नवा संघ

मुंबई/प्रतिनिधीः कोरोना संकट काळात महाराष्ट्रात जाणवणार्‍या रक्त टंचाईवर मात करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदान शिबिरे घेण्याचे आवाहन केले होते. मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत वर्सोवा, यारी रोड प्रभाग क्रमांक 59 च्या युवा अल्पसंख्याक समाजाची मोलाची साथ मिळाली. सध्या सुरू असलेल्या रमझानच्या पवित्र महिन्यात अल्पसंख्याक बांधवांसह समाजातील महिलांनीही उस्फूर्त सहभाग घेतला आणि मध्यरात्रीपर्यंत रक्तदान शिबीर आयोजित करून एक आदर्श ठेवला. या वेळी बाळासाहेब ठाकरे ब्लड बँकेच्या पथकाने 207 युनिट रक्त संकलन केले. 

 सध्या मुंबईत ठिकठिकाणी सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळेत रक्तदान शिबिरे घेतली जात आहेत; मात्र येथील युवा अल्पसंख्याक समाजाने क्लाराज कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्राचार्य अजय कौल यांच्या मार्गदर्शनाखाली यारी रोड वर्सोवा अल्पसंख्याक समाजाच्यावतीने रोझा सोडल्यानंतर रात्री उशिरापर्यंत रक्तदान शिबीर आयोजित केले. मुंबईसह राज्यातील अशा प्रकारे मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या रक्तदान शिबिराची पहिलीच घटना आहे, अशी माहिती पालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष व वर्सोवा विधानसभा संघटक यशोधर फणसे यांनी दिली. परिवहनमंत्री व विभागप्रमुख अनिल परब यांनी रात्रीच्या वेळेस रक्तदान करणार्‍या रक्तदात्यांचे, यारी रोड वर्सोवा अल्पसंख्याक समाजाचे व प्राचार्य अजय कौल यांचे मनापासून आभार मानले. अशी उदात्त कामे करून या तरुणांनी समाजाची वेगळी ओळख निर्माण केली आहे. या तरुणांनी समाजाला नवी दिशा दिली आहे, हे एक स्तुत्य पाऊल आहे, असे या वेळी परब म्हणाले या वेळी यशोधर फणसे, पालिकेच्या आरोग्य समिती अध्यक्ष राजूल पटेल, बाजार उद्यान समिती अध्यक्ष व स्थानिक नगरसेवक प्रतिमा खोपडे, वर्सोव्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सिराज इनामदार, उपविभागप्रमुख प्रसाद आयरे, विना टाक, शाखाप्रमुख सतीश परब, दयानंद सावंत, उदय महाले, बेबी पाटील, क्लाराज कॉलेज ऑफ कॉमर्सचे अ‍ॅक्टिव्हिटी चेअरमन प्रशांत काशीद तसेच शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

COMMENTS